कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात आत्तापासून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. पोटनिवडणुकीत शिवसेनेनं ही जागा काँग्रेसला सोडली होती. त्यानंतर काँग्रेस आणि भाजपत थेट लढत झाली. यात काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी झाल्या.
तसेच, पोटनिवडणुकीत 80 हजार मते घेतल्यानं भाजपनं ( Bjp ) जागेवर दावा कायम ठेवला आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे आमने-सामने आले आहेत.
खासदार धनंजय महाडिक ( Dhananjay Mahadik ) यांनी कोल्हापूर उत्तरवर भाजपचा दावा सांगितला होता. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते, राजेश क्षीरसागर यांनी भाजपच्या नेत्यांना ठणकावलं आहे. कोल्हापूर शहरातील एक जागा आमचीच, असं राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं आहे.
"महायुतीत मिठाचा खडा पडू नये, याची दक्षता घेतली जात आहे. मात्र, शहरातील दोन जागांमधील एक जागा शिवसेनेची आणि दुसरी भाजपची, असं कुणी बोलले म्हणून त्यावर भाष्य केलं पाहिजे, असं नाही," असं म्हणत क्षीरसागर ( Rajesh Kshirsagar ) यांनी कोल्हापूर उत्तरच्या जागेवर ठाम असल्याचं म्हटलं.
"2014 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात दहापैंकी सहा आमदार शिवसेनेचे निवडून आलेले होते. पण, 2019 च्या विधानसभेला अंतर्गत हेवेदाव्यांमुळे शिवसेनेचा केवळ एक केवळ आमदार आला. दोन्ही जागांवर मी दावा करू शकतो. मात्र, मला हेवेदावे टाळायचे आहेत. महायुतीची जबाबदारी असल्यानं तीनही पक्षांच्या भावना दुखावल्या जाऊ नये, हे पाहत आहे. सर्वांना एकत्र घेऊन जायचे आहे," असं क्षीरसागर यांनी सांगितलं.
"मुंबई, ठाण्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. त्यामुळे येथील उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आहे. अन्य कुणाच्या आडवे जायचे नाही. मी विधान परिषदेवर किंवा इतर कुठे जाईन हे माहिती नाही. पण, आम्ही एकदिलानं काम करणार आहोत," असं क्षीरसागर म्हणाले.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.