Suresh Dhas News : सुरेश धस यांनी 15 महिन्यांपूर्वीच्या प्रकरणाला फोडली वाचा, परळी पोलिसांवर साधला निशाणा

Mahadev Munde Murder Case Suresh Dhas : सुरेश धस म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणी आत सीआयडीचे बसवराज तेली यांची मी सोमवारी भेट घेणार आहे. माझ्याकडे जी माहिती आली आहे त्यांना देणार आहे.
Suresh Dhas
Suresh Dhassarkarnama
Published on
Updated on

Suresh Dhas News : संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारवाईच्या मागणीसाठी सुरेश धस आक्रमक झाले आहेत. आका आणि आकाचा आका म्हणत ते वाल्मिक कराड, मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट करत आहेत. आता 15 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या महादेव मुंडे हत्येच्या तपासाला गती मिळावी,यासाठी बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांची भेट घेतली.

सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या भेटीत महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात यावा, अशी मागणी केली. तसेचमस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड व परळी मतदारसंघात झालेल्या विविध हत्याकांड, खंडणी प्रकरणांत पोलिसांनी गुन्हेगारांना उघडपणे पाठीशी घातल्याचे समोर येत आहे. ही बाब पोलिस खात्याच्या विश्वासाहर्तेला धक्का लावणारी आहे, अशी टीका केली.

महादेव मुंडे हत्या प्रकरणात सखोल तपास करून दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना तातडीने सेवामुक्त करण्यात यावे, अशी मागणी देखील धस यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली.

Suresh Dhas
Ministers Staff Appointments : मंत्र्यांच्या स्टाफ नियुक्तीला 'ब्रेक'; शपथविधीला दीड महिना झाला तरी अनेक प्रस्ताव प्रलंबित

'त्या' अधिकाऱ्याकडे जबाबदारी नको

पोलिस अधिक्षकांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सुरेश धस म्हणाले, पोलिस अधीक्षकांनी कबुल केले आहे की परळी पोलिस हा तपास करणार नाहीत. हे प्रकरण एलसीबीकडे देण्यात येईल. पण आकाने तेथे शेख की कोण याला तेथे बसवले आहे. त्यामुळे शेख वगळून जबाबदारी द्या अशी विनंती पोलिस अधिक्षकांना केली आहे.

बसवराज तेलींची भेट घेणार

सुरेश धस म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणी आत सीआयडीचे बसवराज तेली यांची मी सोमवारी भेट घेणार आहे. माझ्याकडे जी माहिती आली आहे त्यानुसार कुणाकुणाचे नंबर चेक करायचे याबद्दल त्यांना बोलणार आहे.

Suresh Dhas
Sudin Dhavalikar : गोव्यातही नितीन गडकरींप्रमाणे भाजपच्या मंत्र्याने स्वपक्षाचे कान टोचले? म्हणाले, सोडचिठ्ठीवाले नको, निष्ठावान जवळ करा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com