Suresh Dhas Crime:सुरेश धस अडचणीत,बीडमधूनच गंभीर आरोप ? 12000 रुपयांसाठी समर्थकांकडून अपहरण अन् लोखंडी रॉडनं मारहाण

BJP MLA Suresh Dhas controversy : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीडमधील गुन्हेगारी जगताची काळी बाजू समोर आणत आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली होती. पण आता याच आमदार धसांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Suresh dhas.jpg
Suresh dhas.jpgSarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात बातमी:

  1. बीडमधील शिरूर तालुक्यात 12 हजार रुपयांच्या वादातून शिवाजी शिंदे या तरुणाचं अपहरण करून त्याला लोखंडी रॉडनं अमानुष मारहाण करण्यात आली.

  2. मारहाण करणाऱ्या आरोपींनी स्वतःला भाजप आमदार सुरेश धस यांचे समर्थक असल्याचं सांगत धमकावल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणानं केला.

  3. पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल न केल्याने स्थानिकांमध्ये संताप असून पीडिताने न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

Beed Crime: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीडमधील गुन्हेगारी जगताची काळी बाजू समोर आणत आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली होती. पण आता याच आमदार धसांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

बीडमधील (Beed) शिरूर तालुक्याच्या नागऱ्याची वाडी येथे अवघ्या 12 हजार रुपयांवरून एका तरुणाचं अपहरण करत त्याला लोखंडी रॉडनं अमानुष मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित शिवाजी शिंदे पोलिसात तक्रार दाखल केली असून आरोपींविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

या घटनेतील पीडित शिवाजी शिंदे या तरुणानं आपल्याला मारहाण करताना आरोपींनी ते आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांचे समर्थक असल्याचं म्हणत होते, असा दावा केला आहे. मात्र,या घटनेमुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Suresh dhas.jpg
Jaykumar Gore: फडणवीसांच्या मध्यस्थीनंतरही गोरेंनी नव्या वादाची वात पेटवलीच; म्हणाले,'...तर फलटणकर अन् 4 नेते तुरुंगात असते!'

पीडित शिवाजी शिंदे यांनी आरोपींनी स्वत:ला भाजप आमदार सुरेश धस यांचे कार्यकर्ते असल्याचं सांगत धमकावल्याचाही आरोपही केला आहे. मला मारहाण करताना आरोपींनी आमदार सुरेश धस यांचे नाव घेतले आणि आम्ही धसांचे कार्यकर्ते आहोत,आमच्यावर कोणीही कारवाई करू शकत नाही,असं म्हणत माझ्यावर हल्ला केल्याचंही शिंदे यांनी सांगत खळबळ उडवली आहे.

पण याचवेळी शिवाजी शिंदे या तरुणानं आमदार सुरेश धस हे अशा कोणत्याही गोष्टीला प्रोत्साहन देणार नाहीत. परंतु त्यांच्या नावाचा वापर करत चुकीची कृत्यं करणाऱ्या गुन्हेगारांना थारा न मिळता अद्दल घडवली पाहिजे,असा इशाराही त्याने दिला.

Suresh dhas.jpg
Best Election: 'बेस्ट'च्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना चितपट करणाऱ्या शशांक राव अन् लाडांना भाजपनं दिलं 'हे' मोठं गिफ्ट

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,शिरूर तालुक्याच्या नागऱ्याची वाडी येथे राहणार्‍या शिवाजी शिंदे या तरुणाचं अवघ्या 12,000 रुपयांच्या वादातून अपहरण करण्यात आले.आरोपींनी यावेळी संबंधित तरुणाला त्याच्या घरातून उचलून हनुमान मंदिराजवळील परिसरात नेलं.त्याठिकाणी त्याला लोखंडी रॉडनं अमानुष मारहाण करण्यात आली.

या मारहाणीत आरोपींचा तरुणाचा खून करण्याचाच हेतू होता,असा आरोप या घटनेत जबर जखमी झालेल्या शिवाजी शिंदे यानं केला आहे.आरोपींनी केलेल्या मारहाणीत शिंदे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

याचदरम्यान,या घटनेतील आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्याकडून आपल्या माझ्या जीवाला सतत धोका असल्याचा आरोपही शिवाजी शिंदे यानं केला आहे.तसेचउद्या मला काही झाले तर त्यासाठी हेच लोक जबाबदार असणार असल्याचंही त्यानं म्हटलं आहे.

Suresh dhas.jpg
Delhi CM Attacked : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर एवढा राग का? रेखा गुप्तांआधी केजरीवालांवर तब्बल 9 वेळा हल्ला

याप्रकरणी पोलिसांनी अद्यापही गुन्हा दाखल केलेला नसून आरोपींवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी या मारहाणी प्रकरणातील शिवाजी शिंदे या तरुणानं पोलिस प्रशासनाकडे केली आहे.

सुरेश धसांचा कार्यकर्ता 'खोक्या' भाई...

बीडमध्ये पैशांचे बंडल उधळणारा भाजपचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता अशी ओळख असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. शिरूर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात त्याला जामीन मिळाला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला बॅटने बेदम मारहाण करतानाचा खोक्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. वेगवेगळ्या प्रकरणांमुळे खोक्या चर्चेत आला होता. त्याचे पैशांचे बंडल उधळतानाचा व्हिडीओ समोर आला होता.

Q1. शिवाजी शिंदे यांच्यावर हल्ला का झाला?
👉 फक्त 12 हजार रुपयांच्या वादातून त्याचं अपहरण करून मारहाण करण्यात आली.

Q2. आरोपींनी मारहाणीवेळी काय सांगितलं?
👉 आरोपींनी स्वत:ला भाजप आमदार सुरेश धस यांचे कार्यकर्ते असल्याचं सांगून धमकावलं.

Q3. पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली आहे?
👉 अद्याप कोणताही गुन्हा दाखल न झाल्याने पोलिसांवर टीका होत आहे.

Q4. पीडित तरुणाची काय मागणी आहे?
👉 आरोपींवर तात्काळ कारवाई करून आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी शिवाजी शिंदे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com