Manoj Jarange Patil : सुरेश धस, मनोज जरांगे पाटील यांच्याकडून पुन्हा धनंजय मुंडे टारगेट!

Manoj Jarange Patil Political Attack On Dhananjay Munde : पंचवीस-तीस वर्ष आमच आरक्षण खाल्लं, मराठा आरक्षणाने वंजारी, धनगर समाला धक्का नाही, मनोज जरांगेनी स्पष्टच सांगितले.
Suresh Dhas-Manoj Jarange Patil Political Attack On Dhananjay Munde
Suresh Dhas-Manoj Jarange Patil Political Attack On Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on
Summary

Summery

1.सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

2. मराठ्यांविरोधात वंजारी, धनगर समाजाला भडकावण्याचे काम करत असल्याचा आरोप.

3. मराठा आरक्षणामुळे कोणाच्याही आरक्षणाला धक्का नाही, जरांगे यांचे स्पष्टीकरण.

Maratha Reservation Controversy News : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि आष्टीचे भाजपा आमदार सुरेश धस या दोघांनी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्याकडे पुन्हा एकदा आपला मोर्चा वळवल्याचे दिसते. सरपंच संतोष देशमुख प्रकरण तडीस लावून एका बड्या नेत्याची विकेट घेतली, असे म्हणत धस यांनी धनंजय मुंडे यांना डिवचले. तर मराठा आरक्षणावरून वंजारी आणि धनगर समाजाला आमच्या विरोधात भडकवल्याचा आरोप करत धनंजय मुंडे यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली.

'एक डोळा चष्म्यातून बाहेर येत आहे, गरिबांचे वाटोळ करण्याची बेक्कार फेड असते' अशा शब्दात जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला. मुंबईच्या आझाद मैदानात पाच दिवसाचे बेमुदत उपोषण करून मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची आपली मागणी सरकारकडून मंजूर करून घेतली. आता या गॅझेटच्या आधारे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज ओबीसीत जाणार, असा दावा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांच्याकडून केला जात आहे.

या जीआर वरून ओबीसी समाजामध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांच्यासह राज्यातील सर्व ओबीसी नेते हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे याच गॅझेटच्या आधारावर बंजारा, महादेव कोळी व इतर जातींनी आदिवासींना लागू असलेले एसटीचे आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू केले आहे. यातून पुन्हा एकदा मराठवाड्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झाला आहे.

Suresh Dhas-Manoj Jarange Patil Political Attack On Dhananjay Munde
Suresh Dhas : एका नेत्याची विकेट पडली, अगदी क्लीन बोल्ड! सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना डिवचले

यावर मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. परळीच्या लाभार्थी टोळीला बोलता येत नसल्याने इतरांच्या माध्यमातून मराठ्यांविरोधात गरीब धनगर आणि वंजारी समाजाला भडकावले जात आहे. त्याचा एक डोळा चष्म्यातून बाहेर येत आहे, गरिबांचे वाटोळं करण्याची बेकार फेड असते, असे म्हणत जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर राग व्यक्त केला.

Suresh Dhas-Manoj Jarange Patil Political Attack On Dhananjay Munde
Manoj Jarange ultimatum : मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा 'अल्टीमेटम'; थेट 1994च्या जीआर हात घालण्याची तयारी

नियमानुसार ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना लाभ दिला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आम्ही त्यांच्यासारखे जातीयवादी नाहीत. जे विरोध करतायेत ते यांचेच कार्यकर्ते आहेत, परळीची लाभार्थी टोळी धनगर समाजाला मराठ्यांच्या विरोधात उभे केले जात आहे. मराठा आरक्षणामुळे कुठेही धनगर, वंजारी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही ही वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे, असे आवाहनही मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना केले.

मराठा आरक्षणाच्या विरोधात नागपूरसह राज्यभरात ओबीसींचे नेते आंदोलन करत आहे. याचे आपल्याला दुःख वाटतंय, आमच्या लेकरा- बाळाला आरक्षण मिळत असताना विरोध कशासाठी? तुम्हाला महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे का? तुमचे इतके वाईट विचार का? असा सवाल करत आम्ही आरक्षण लढून मिळवले, इतकी वर्ष आमचं आरक्षण तुम्ही खात होता, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला.

येवल्याचा अलिबाबा..

ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा 'चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा अलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो, मागच्या पंचवीस वर्षाचा इतिहास काढा तुम्ही ओबीसीच्या जागा घेऊन ओपन मधल्या जागाही घेतल्या. मग ओपन मधल्या सगळ्या जागा सोडा, असे आव्हान जरांगे पाटील यांनी भुजबळ यांना दिले. तुम्ही कितीही विरोध केला तरी महाराष्ट्रातील मराठ्यांना मी आरक्षण देणारच, असेही जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले.

FAQ

1. अलीकडे धनंजय मुंडे यांना कोणी टार्गेट केले?
सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा त्यांच्यावर निशाणा साधला.

2. धस आणि जरांगे पाटील यांनी मुंडेंवर टीका का केली?
त्यांनी तीव्र राजकीय हल्ले करत वैर अधिक तीव्र केले.

3. याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम झाला?
यामुळे तणाव वाढून नवे वादंग निर्माण झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com