Suresh Kute : ...अखेर कुटे दाम्पत्यास पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलंच!

Suresh Kute and Ashish Patodkar Arrested : माजलगाव पोलिस ठाण्यात दाखल फसवणूकीच्या गुन्ह्यात सुरेश कुटे व आशिष पाटोदकर या दोघांना अटक करण्यात आली.
Suresh Kute  and Archana Kute
Suresh Kute and Archana KuteSarkarnama

Suresh Kute and Archana Kute News : ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडीट को - ऑपरेटीव्ह सोसायटीचे अध्यक्ष सुरेश कुटे, कार्यकारी संचालिका अर्चना कुटे व संचालक अशिष पाटोदकर या तिघांना पोलिसांनी शुक्रवारी सकाळी पुणे येथून ताब्यात घेतले. चौकशीनंतर सुरेश कुटे व अशिष पाटोदकर या दोघांना पोलिसांनी माजलगावच्या गुन्ह्यात अटक केली. दोघांना 13 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

द कुटे उद्योग समुहाचे प्रमुख सुरेश कुटे(Suresh Kute) अध्यक्ष असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या 50 शाखांचे मागच्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या महाराष्ट्रासह इंदुर (मध्य प्रदेश) आदी ठिकाणी 50 शाखा असून साडेसहा लाख खातेदार आहेत. ज्ञानराधाच्या विविध शाखांत दोन हजार कोटी रुपयांहून अधिक ठेवी अडकलेल्या आहेत.

Suresh Kute  and Archana Kute
Pankaja Munde : पराभव झाला तरी पंकजा मुंडे खासदार होणार?

सुरेश कुटे यांच्याकडून सातत्याने ठेवीदारांना पैसे देण्याची आश्वासने दिली गेली. परदेशी उद्योग समुह गुंतवणूक करत असून त्यातून आपण ठेवीदारांचे पैसे देणार असल्याची आश्वासने सुरेश कुटे देत होते.

दरम्यान, त्यांच्या पत्नी अर्चना कुटे व मुलगा आर्यन कुटे यांनी त्याच काळात नागपूर गाठून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांच्या समुहात परदेशी गुंतवणूक येईल व आपले पैसे मिळतील, अशी ठेवीदारांना अपेक्षा वाटत होती.

मात्र, प्रत्येक वेळी त्यांनी वेळा वाढविल्या. त्यामुळे वैतागलेल्या ठेवीदारांनी त्यांच्यावर अलिकडे माजलगाव, बीड, नेकनूर आदी पोलिस ठाण्यांत नऊ गुन्हे नोंद केले. अगोदर समुहात दोन हजार कोटी रुपये आल्याचे सांगणारे सुरेश कुटे यांनी मागच्या तीन दिवसांपूर्वी हाच आकडा अडीच हजार कोटी रुपयांनी वाढवून साडे चार हजार कोटी रुपये आले असा सांगीतला होता.

Suresh Kute  and Archana Kute
Suresh Kute : इनसाइड स्टोरी, द कुटे ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटेंना घेरण्यासाठी भाजपने असं टाकलं जाळं

दरम्यान, मागच्या पंधरवाड्यापूर्वी बीडला आलेल्या सुरेश कुटे यांना ताब्यात घेण्याचे पोलिस दलाने नियोजन केले होते. मात्र, त्यांना त्याची खबर लागल्याने ते निघून गेले. मात्र, निवडणुकीची व निकालाची धामधुम संपताच पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी या मोहिमेत केवळ अधिकारी सामावून घेतले.

अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी व तपास अधिकारी विश्वांभर गोल्डे, पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेखा धस, फौजदार राजाभाऊ गुळभिले आदींच्या पथकाने या दोघांना पुणे येथील फ्लॅटमधून ताब्यात घेतले.

त्यानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयात आणून त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर माजलगाव पोलिस ठाण्यात दाखल फसवणूकीच्या गुन्ह्यात सुरेश कुटे व आशिष पाटोदकर या दोघांना अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघांना 13 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com