Beed Crime News : बीड जिल्ह्यातील उपसरपंचाचा संशयास्पद मृत्यू ; डोक्यात गोळी घुसलेला मृतदेह कारमध्ये आढळला..

In Beed’s Georai taluka, Lukhamasla village deputy sarpanch Barge was found dead : सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि त्यानंतर झालेल्या निर्घृण हत्या प्रकरणाच्या जखमा ताज्या असतानाच आता उपसरपंच बरगे यांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे.
Sarpanch Shot Dead In Solapur District News
Sarpanch Shot Dead In Solapur District NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे उपसरपंच गोविंद जगन्नाथ बरगे यांचा मृतदेह सासुरे गाव शिवारातील कारमध्ये आढळून आला. कारमध्येच त्यांच्या शेजारी पिस्तुल आढळले. शिवाय पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये बरगे यांच्या डोक्याला गोळी लागल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या? याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेने पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि त्यानंतर झालेल्या निर्घृण हत्या प्रकरणाच्या जखमा ताज्या असतानाच आता उपसरपंच बरगे यांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. (Beed News) ही घटना सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील सासुरे गावात मंगळवारी सकाळी उघडकीस आली. गोविंद जगन्नाथ बरगे (वय 38) रा. लुखामसला ता. गेवराई असे मृत झालेल्या उपसरपंच यांचे नाव आहे.

सोमवारी गोविंद बरगे हे खासगी कामानिमित्त बार्शी (जि. सोलापूर) या ठिकाणी कारने गेले होते. मंगळवारी(ता. 9) सकाळी बरगे यांचा सासुरे गाव शिवारात कारमध्ये मृतदेह आढळून आला. (Georai) या घटनेची माहीती मिळताच वैराग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे हे पोलिस पथकासह घटनास्थळावर दाखल झाले. घटनेची पाहणी करत पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीस पाठविण्यात आला.

Sarpanch Shot Dead In Solapur District News
Beed News : आधी वकील, आता बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याने संपवले जीवन!

दरम्यान, गोविंद बरगे यांच्या डोक्याला पिस्तुलची गोळी लागल्याची जखम आढळून आली आहे. त्यांच्या कारमध्ये मृतदेहाजवळ पिस्तुलही सापडले. त्यामुळे बरगे यांची गोळी झाडून हत्या झाली, की त्यांनी आत्महत्या केली? याची चर्चा जिल्हाभरात होत आहे. या घटनेने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाला आहे. उपसरपंच बरगे यांचा कोणाशी काही वाद होता का? ते बार्शीला नेमके कशासाठी गेले होते? त्यांच्यासोबत कोण कोण होते? याचा तपास पोलीस करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com