Dhananjay Deshmukh Beed : धनंजय देशमुखांच्या घर परिसरात अज्ञात महिलेचा संशयितरित्या वावर; कृष्णा आंधळेचे पुरावे असल्याचा दावा

Unidentified woman suspiciously residence Dhananjay Deshmukh Masajog Beed investigating matter : बीड मस्साजोग गावचे मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या घर परिसरात अज्ञात महिलेचा वावर आढळल्याने खळबळ उडाली आहे.
Dhananjay Deshmukh Beed
Dhananjay Deshmukh BeedSarkarnama
Published on
Updated on

Beed breaking news : बीड मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला जिल्हा न्यायालयात सुरू आहे. या हत्येनं राज्य हादरलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीडमधील नेते आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप आहे. त्याच्यासह हत्येत सहभागी असलेल्या आठ जणांना अटक झाली असून आता खटला सुरू आहे.

या हत्येतील कृष्णा आंधळे हा आजही वाँटेड आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेसंदर्भात आजही वेगवेगळे पैलू समोर येत आहेत. अशी एक घटना संतोष देशमुख आणि त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या घर परिसरात शनिवारी घडली आहे. एक अज्ञात महिला देशमुख यांच्या घर परिसरात संशयितरित्या वावर होती. या प्रकारानं खळबळ उडाली आहे.

बीड (BEED) जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराच्या परिसरात ही अज्ञात महिला शनिवारी सायंकाळी सहा वाजता आली होती. तत्पूर्वी ती देशमुख यांच्या घर परिसरात संशयितरित्या वावरत होती. केज पोलिस देशमुख यांच्या घरी आल्यानंतर अज्ञात महिला पसार झाली.

Dhananjay Deshmukh Beed
Ravindra Chavan BJP : मुंबईहून भाजप कार्याध्यक्षांचा फोन अन् मंडल अध्यक्षाच्या निवडीला स्थगिती; विखे समर्थकाची कोणी केली तक्रार?

ही महिला घर परिसरात वावरल्यानंतर देशमुख कुटुबिंयांनी घरासमोर उभारलेल्या मंडपामध्ये दाखल झाली. ही महिला बराच वेळ मंडपात बसून होती. माझ्याकडे फरार कृष्णा आंधळेचे पुरावे आहेत. तो माझ्यासोबत राहतो. त्याचे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा करत होती. या महिलेची माहिती मिळताच, पोलिस देखील देशमुख यांच्या घरी महिला पोलिसांसह दाखल झाले.

Dhananjay Deshmukh Beed
Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ''...त्यानंतर त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसतोय'' ; मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींना टोला!

या महिलेने देशमुख यांच्या घरातील स्वच्छतागृह वापरण्याची मागणी केल्याची माहिती समोर आली. देशमुख कुटुंबियांनी दुसरीकडे स्वच्छतागृहाची सोय करून दिली. यानंतर तिने देशमुख यांच्या घरातील स्नानगृहात अंघोळ करायची आहे, असा हट्ट धरला. यानंतर ती देशमुख यांच्या घराच्या परिसरात बसून राहिली. कृष्णा आंधळेविषयी सकाळी सर्व सांगते, अशी म्हणत तिने शनिवारची रात्र मंडपात झोपून काढली.

या अज्ञात महिलेकडे पोलिसांनी तिच्याकडे सकाळी चौकशी सुरू केल्यावर तिने नाव सांगण्यात नकार दिला. यानंतर ती निघून गेली. पुढे एसटी बसने प्रवास केल्याची माहिती मिळते. या अज्ञात महिलेची माहिती पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली असून, ती महिला रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.

धनंजय देशमुख म्हणाले....

धनंजय देशमुख म्हणाले, "महिला ज्यावेळी घर परिसरात आली, त्यावेळी मी बाहेरगावी होतो. घरच्यांनी मला त्या महिलेविषयी माहिती दिली. कृष्णा आंधळेबाबत पुरावे आहे, कोठे राहतो, हे माहिती असल्याचे सांगत आहे, असे घरच्यांनी सांगितले. मी रात्री उशिरा आलो". तिच्याशी बोलल्यावर संबंधित महिलेनं सकाळी सर्व सांगते, अशी म्हटली. त्यावेळी पोलिस देखील होते. महिला पोलिस देखील होत्या. तिच्या माहितीवरून रत्नागिरी पोलिसांशी संपर्क केला. त्यावर अशा महिलेने तक्रारी केल्याची माहिती समोर आली आहे. परंतु महिला सायंकाळी थांबून पुढं सकाळी ती निघून गेली. आता पोलिस माहिती घेत आहेत, असे देशमुख यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com