Ravindra Chavan BJP : मुंबईहून भाजप कार्याध्यक्षांचा फोन अन् मंडल अध्यक्षाच्या निवडीला स्थगिती; विखे समर्थकाची कोणी केली तक्रार?

BJP Shevgaon Mandal President Ahilyanagar Ravindra Chavan : अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव आणि वाळकी चिंचोडी पाटील मंडल अध्यक्षांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे.
Ravindra Chavan BJP
Ravindra Chavan BJPSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar BJP : राज्यभरात भाजप मंडल अध्यक्षपदाच्या निवडी सुरू आहेत. यासाठी पक्षातंर्गत निवडणुका सुरू आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नियुक्तींना महत्त्व प्राप्त झालं आहे. पद खेचून घेण्यासाठी पक्षातंर्गत पदाधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू असून, कुरघोड्या रंगल्या आहेत.

भाजपमध्ये एकप्रकारे गटबाजी उफाळली आहे. यातून मंडल अध्यक्षाच्या नियुक्ती पडलेली माळ पक्षाचे कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या एका फोननंतर अवघ्या काही तासात काढून घेण्यात आल्याचा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात घडला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डीमधील भाजपच्या (BJP) मंडल अध्यक्षपदांच्या निवडी प्रदेश कार्यालयाच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आल्या होत्या. शेवगाव मंडलाचे अध्यक्ष म्हणून अमोल सागडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. पदावर संधी मिळाल्याने सागडे आणि त्यांच्या समर्थकांनी उत्साह होता.

Ravindra Chavan BJP
Laxman Hake : पवारसाहेबांपासून अजितदादा खरंच वेगळे झालेत का? लक्ष्मण हाके म्हणाले, 'महाराष्ट्राला वेड्यात...'

अमोल सागडे समर्थक जल्लोष करणार, तेवढ्या पक्षाचे कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांचा फोन आला अन् नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. ही सर्व घडामोडी तासाभरातच घडली. त्यामुळे अमोल सागडे यांच्या नावाला विरोध करणारी तक्रार थेट कार्याध्यक्षांकडे कोणी केली याची चर्चा भाजपतंर्गत सुरू झाली आहे.

Ravindra Chavan BJP
Pooja Khedkar News: सर्वोच्च न्यायालयाचा वादग्रस्त पूजा खेडकरबाबत मोठा निर्णय; अडचणी वाढणार?

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात शेवगाव, बोधेगाव, पाथर्डी आणि कोरडगाव, अशी चार मंडल आहेत. शेवगावसाठी अमोल सागडे, बोधेगावसाठी संजय टाकळकर, पाथर्डीसाठी धनंजय बडे, कोरडगावसाठी दिंगबर भवर, या चार जणांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. पण अमोल सागडे यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली.

मंडल निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. भानुदास बेरड यांच्याशी चर्चा केल्यानंतर शेवगावबरोबर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील वाळकी चिचोंडी पाटील मंडलातील नियुक्तीला देखील स्थगिती देण्यात आल्याची माहिती दिली. ही सर्व कार्यवाही कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार झाल्याचे प्रा. बेरड यांनी सांगितले. अमोल सागडे हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील समर्थक मानले जातात. यातूनच अमोल सागडे यांच्या नियुक्तीला विरोध करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com