Dharashiv News : धाराशिवमध्ये स्वाभिमानी आक्रमक ; राजू शेट्टी काढणार ट्रॅक्टर मोर्चा...

They will attack the collector's office for debt relief, onion export ban, milk tariff : कर्जमुक्ती, कांदा निर्यात बंदी, दूध दरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार...
Raju Shetti
Raju ShettiSarkarnama
Published on
Updated on

- शितल वाघमारे

Dharashiv News : कांदा निर्यात बंदी, दुधाचे दर यासह विविध शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी धाराशिव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा व भव्य सभेचे सोमवार, 15 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. सभेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी, उच्चाधिकार समितीचे प्रा. डॉ. प्रकाश पोफळे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे, कांद्यावरील निर्यातबंदी तात्काळ उठवावी, दुध दरवाढीवर तात्काळ शेतकर्‍यांना भाव दिला पाहिजे. शेतीमाल उत्पादनाच्या आधारित दीडपट हमीभाव द्यावा, शेतकर्‍यांना वन्य प्राण्यांच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी सरकारने 100 टक्के कुंपण योजना अनुदानित करावी या प्रमुख मागण्यांसाठी हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येत आहे.  

Raju Shetti
Jayant Patil News : महाराष्ट्र बघतोय, राजकीय संस्कृतीचे धिंडवडे.. यूपी-बिहारपेक्षा वाईट; पाटलांनी डागली तोफ!

शेतकऱ्यांच्या कांद्याचे, सोयाबीनचे, कापसाचे, तुरीचे व इतर पिकांचे भाव हे सरकार सातत्याने पाडण्याचे काम करीत असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. विशेष म्हणजे आयात धोरण राबवून शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव तर तर सोडाच किमान लागवड खर्च देखील निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे यासाठीही स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत बिकट असताना सुद्धा सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही. कांद्याला भाव मिळत असताना केवळ शहरी भागातील मतदारांना खुश करण्यासाठी कांदा निर्यात बंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यामुळे कांदा बे भाव विकावा लागत असून कांदा लागवडीचा खर्च देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक आरिष्ट उभा ठाकले आहे. असाच प्रकार सोयाबीन, कापूस व इतर पिकांच्या बाबतीत होत असून सरकारने भाव पाडल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे पाटील, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दामू इंगोले, परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, कार्याध्यक्ष रवीकिरण गरड, राज्य कार्यकारिणी सदस्य बिभीषण भैरट, जिल्हा संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, स्वाभिमानी युवा आघाडीचे अध्यक्ष विष्णू काळे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राजाभाऊ हाके, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, संपर्कप्रमुख ईश्वर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. या मोर्चासाठी स्वाभिमानी पक्षाचे तालूकाध्यक्ष नेताजी जमदाडे, तालुकाध्यक्ष गुरूदास भोजने, बाळासाहेब मडके, चंद्रकांत समुद्रे, आदी पदाधिकारी गावागावात जनजागृती करत आहेत. या मोर्चात शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी केले आहे.

(Edited by Amol Sutar)

Raju Shetti
Satara NCP : जे गेलेत त्यांची चिंता करू नका..! बालेकिल्ला टिकवण्याचे शिवधनुष्य कार्यकर्त्यांच्या हातात...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com