Satara NCP : सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. तो अबाधित ठेवण्याचे शिवधनुष्य कार्यकर्त्यांच्या हातात आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एकनिष्ठ कार्यकर्ते पक्षात राहिले आहेत. जे गेलेत त्यांची चिंता करू नका. यापुढे कार्यकर्त्यांना लागेल ती ताकद देण्याचे काम आम्ही सर्व नेतेमंडळी करु, असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष ननवरे यांनी राष्ट्रवादी भवन असंघटित कामगारांचा मेळावा आयोजित केला होता.यावेळी अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील होते. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, दीपक पवार, तेजस शिंदे, समिंद्रा जाधव, संजना जगदाळे, कविता म्हेत्रे, पुजा काळे, संगीता साळुंखे, गोरख नलवडे, राजकुमार पाटील उपस्थित होते.
शशिकांत शिंदे म्हणाले, पक्षाच्या अडचणीच्या काळात ज्यांनी साथ दिली, त्यांना न्याय देण्याचे काम भविष्यात केले जाईल. पक्ष मजबुतीसाठी आणि पक्ष व्यापक व्हावा, यासाठी बुथ कमिट्या सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील असले पाहिजे. दरम्यान, असंघटित कामगारांच्या समस्या व त्यांचे येणारे प्रश्न त्याची सोडवणूक कशी करायची याबाबत ही यावेळी मार्गदर्शन केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
श्रीनिवास पाटील म्हणाले, जिल्ह्यातील सर्व फ्रंटल सेलच्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करावी, त्याचबरोबर प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपापली गावातील बुथ कमिट्या सक्षम कराव्यात. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील घटकांपर्यंत पोचवली पाहिजेत. आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ज्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोचवण्याचे काम करावे.
त्याचबरोबर येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणूकीसाठी आता सर्वच पक्ष सातारा जिल्हा हा आपल्याला मिळावा म्हणून प्रयत्नशील आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच तयारीला लागावे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीमागे सर्वांनी एकसंघ ताकद ठेवून सातारा हा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला राहील यासाठी जोमाने काम करावे.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.