Beed Politics : कुटेंना प्रवेश देऊन भाजपने काय 'साधले'? सहा लाख गरिबांचे दोन हजार कोटींच्या ठेवी मिळेनात...

Suresh kute and Archana kute : "लोकांचे ज्ञानराधात अडकलेले दोन हजार कोटी रुपये मिळावेत, अशी सामान्यांची अपेक्षा आहे."
Beed Politics
Beed PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Beed News : अगोदर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आणि मग ईडी, सीबीआय किंवा आयकर विभागाचे छापे आणि मग भाजप प्रवेश, असे सत्र मागच्या काही वर्षांपासून सुरु आहे. भाजपमध्ये प्रवेश करणारे सगळेच 'धुतल्या तांदळा'सारखे होतात, अशी थेअरी आघाडीचे उद्योजक अर्चना व सुरेश कुटे दाम्पत्याबाबत घडली. त्यांच्या उद्योगांची केंद्रीय संस्थांनी तपासणी केली आणि मग घाईगडबडीत कुटे दाम्पत्याचा नागपूरला भाजप प्रवेश झाला. मात्र, कुटेंच्या ज्ञानराधात साडे सहा लाख गरिबांच्या अडकलेल्या ठेवी साडे पाच महिन्यानंतरही मिळण्याचे नाव नाही. मग, भाजपने कुटेंना प्रवेश देऊन काय ‘साधले’ असा प्रश्न आहे.

येथील बडे उद्योजक अर्चना कुटे व सुरेश कुटे दाम्पत्याच्या 'द कुटे ग्रुप'चे दुध, तेल, पेंड, बांधकाम, लॉजिस्टीक असे अनेक व्यवसाय आहेत. मात्र, या सर्व व्यवसायांचा आर्थिक पाया कुटेंच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडीट को - ऑपरेटीव्ह सोसायटीमधील ठेवींवर आहे. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र व अगदी इंदौर (मध्य प्रदेश) पर्यंत 50 शाखा आणि तब्बल साडे सहा लाख खातेदार आहेत. तर, ज्ञानराधामध्ये दोन हजार कोटी रुपयांहून अधिक ठेवी आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात 'द कुटे ग्रुप'ची आयकर विभागाने तपासणी केली. यामुळे सुरेश कुटे अध्यक्ष असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटमधून पैसे काढण्यासाठी खातेदारांची झुंबड उडाली. चारच दिवसांत लिक्वीडीटी फंड संपला. त्यामुळे ठेवीदारांचा हाहाकार सुरु झाला. सर्व शाखांसह बीडमधील ज्ञानराधाच्या मुख्य कार्यालयालाही कुलूप लागले.

Beed Politics
BJP Politics: कोल्हेंची नाराजी कधी दूर होणार? विखेंसोबत एकाच मंचावर येण्याचं टाळलं!

दरम्यान, द कुटे समुहाचे काही समभाग विकून या व्यवहारातून मिळणाऱ्या पैशांतून ज्ञानराधाच्या ठेवीदारांचे पैसे देण्याचे सुरेश कुटे यांनी जाहीर केले. त्यांच्याकडून द कुटे समुहातील समभाग विकण्याचे प्रयत्न सुरु असताना याचा व्यवहार ते दुबईस्थितीत उद्योजकासोबत असल्याचे सांगत होते. साहाजिकच या सर्व व्यवहारांची प्रक्रिया केंद्र सरकारच्या विविध खात्यांच्या निगराणीखाली होती. अगोदर आयकर विभागाची तपासणी नंतर केंद्र सरकारच्या खात्यांच्या परवानग्या म्हणजे एकंदरीत ‘भाजप’ केंद्रस्थानी आलेच.

विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांच्या अस्थापना, व्यवसाय, संस्था, कारखान्यांबाबत जसे ‘ईडी’, ‘आयकर’ छापे आणि मग पक्षात प्रवेश किंवा सहयोगी पक्ष असे चक्र सध्या सुरु तोच फॉर्म्युला जणू सुरेश कुटे यांच्याबाबतही झाला. मात्र, त्यांच्या भाजप एंट्रीचा फायदा कुटेंच्या व्यवहाराला होणार होता की भाजपला याचे कोडे अद्यापही उलगडलेले नाही.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत नागपूरला अर्चना कुटे, सुरेश कुटे व त्यांचा मुलगा आर्यन कुटे यांनी भाजपात प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यासाठी बीडशी तसा संबंध नसलेले माजी खासदार अमर साबळे देखील तातडीने पुण्याहून नागपूरला पोचले. आता कुटे यांची पार्श्वभूमी राजकीय नाही. मात्र पैशांचा व्यवहार तर मोठा आहे. मग, भाजपने त्यांना प्रवेश देताना नेमके काय ‘गणित’ मांडले हे जाणकारांना कळण्यासारखे आहे.

Beed Politics
Lok Sabha Election 2024 : मनोज जरांगेंना ‘स्वाभिमानी’चे बळ; जालना, बीड लोकसभेसाठी साकडं

दरम्यान, भाजपने (BJP) कुटेंना पक्षप्रवेश देऊन जे ‘साधायचे ते साधले’ असले तरी साडे पाच महिन्यांचा काळ लोटला तरी सहा लाख ठेवीदारांचे दोन हजार कोटी रुपये त्यांच्या ज्ञानराधात अडकलेले कायम आहेत. व्यवहार पूर्णत्वाकडे गेलाय, पैसे खात्यावर आले आणि थोड्याशा तांत्रिक बाबी अपूर्ण असल्याचे ठेवीदारांना मागच्या महिन्यापासून सांगीतले जात आहे. आता दोन हजार कोटी रुपये नेमके कशात अडकले आणि भाजपने त्यांना प्रवेश देताना काय पाहीले, या जरी लोकांसमोर नसले तरी लोकांचे ज्ञानराधात अडकलेले दोन हजार कोटी रुपये मिळावेत, अशी सामान्यांची अपेक्षा आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com