Bajrang Sonwane : साहेब, आता फक्त तब्येतीला जपा; विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो! बजरंग सोनवणेंची भावनिक साद

Beed Lok Sabha Constituency : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचाराची ही पहिलीच मोठी सभा होती. सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज देखील साधेपणाने एकट्याने जाऊन भरला. आतापर्यंत सोनवणे जिल्ह्यात तालुकानिहाय संवाद दौरे काढून बैठका घेत आहेत.
Sarad Pawar, Bajrang Sonwane
Sarad Pawar, Bajrang SonwaneSarkarnama

Beed Political News : बारामती येथील सभेत जेष्ठ नेते शरद पवार यांचा आवाज बसला होता आणि त्यानंतर त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली. त्यांच्या तब्येतीबद्दल बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी 'साहेब, आता आमचं ऐका! आता ही खिंड आम्हालाच लढू द्या. तुम्ही फक्त आणि फक्त तब्येतीला जपा, अशी भावनिक साद सोशल मीडियाद्वारे पोस्ट करून केली आहे.

प्रकृती अस्वस्थतेमुळे सोमवारी (ता. 6) असणारे शरद पवार Sharad Pawar यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या लोकसभा निवडणुकीच्या काळात पवार प्रथमच सोमवारी जिल्ह्यातील आष्टी येथे बजरंग सोनवणे यांच्यासाठी प्रचार सभा घेणार होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचाराची ही पहिलीच मोठी सभा होती. सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज देखील साधेपणाने एकट्याने जाऊन भरला. आतापर्यंत सोनवणे जिल्ह्यात तालुकानिहाय संवाद दौरे काढून बैठका घेत आहेत. गावोगावी त्यांचे बैलगाडीतून मिरवणुका, तुतारीच्या निनादात जंगी स्वागत केले जात आहे.

दरम्यान, सोनवणे Bajrang Sonwane यांच्यासाठी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शरद पवारांची पहिलीच मोठी सभा सोमवारी होणार होती. मात्र पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे ही सभा रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर बजरंग सोनवणे यांनी पवारांना तब्येतीला जपण्याची भावनिक साद घालत विजय खेचून आणण्याचा शब्द दिला आहे.

Sarad Pawar, Bajrang Sonwane
Beed Loksabha : बजरंग सोनावणेंचा विजय निश्चित, संदीप क्षीरसागरांनी सांगितले कारण

सोनवणे म्हणाले, 'माझ्या प्रचारार्थ आयोजित आष्टीतील सभेला आपण येणार नाही, हे समजले आणि साताऱ्याच्या सभेची आठवण झाली. त्यावेळी तुम्ही पावसाला थांबू शकला नव्हतात, पण पाऊसही तुम्हाला थांबवू शकला नाही.. तुमची तब्येत खराब झाल्याचे कळले. तुम्ही पाच - सहा दशकात अशा निवडणुका कित्येक बघितल्या असतील. पण साहेब, आता आमचं ऐका! आता ही खिंड आम्हालाच लढू द्या. तुम्ही फक्त आणि फक्त तब्येतीला जपा!'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sarad Pawar, Bajrang Sonwane
CM Shinde : एकनाथ शिंदेंच्या संवेदनशीलतेचा प्रत्यय! प्रचार रॅली सोडून हात भाजलेल्या रूंद्राशच्या मदतीला धावले

'लढणं, तेही विपरीत परिस्थितीत, तुम्ही या देशाला दाखवून दिले आहे. विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो! आता पुढची जबाबदारी आमची. ही निवडणूक आता शरद पवारांचे कार्यकर्ते म्हणूनच लढू द्या! साहेब फक्त प्रकृतीची काळजी घ्या. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही हा इतिहास आहे. तो इतिहास आम्ही जपू, तुम्ही फक्त, तब्येतीला जपा आणि तुमचा आशीर्वाद पाठीशी राहुद्या!, असेही सोनवणे म्हणाले आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Sarad Pawar, Bajrang Sonwane
Solapur Loksabha : सिद्धेश्वर कारखाना बंद पाडून मला संपविण्याचा भाजपचा डाव होता; धर्मराज काडादींनी ठेवले मर्मावर बोट...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com