Dhananjay Munde On Onion Rate : धनंजय मुंडे यांनी मानले पंतप्रधानांचे आभार; म्हणाले ,"कांद्याला ऐतिहासिक भाव.."

Dhananjay Munde On Narendra Modi : "केंद्र सरकारने आता पर्यंत तीन लाख टन कांद्यांची खरेदी केली आहे. "
Dhananjay Munde On Onion Rate :
Dhananjay Munde On Onion Rate : Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : कांदा या पीकाचे पडलेल्या दरावरून राज्यातील राजकारण पेटल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर तब्बल ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्याने, अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे केंद्र सरकार शेतमालाचे दर कमी करण्याचे षड्-यंत्र करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होऊ लागला आहे. दरम्यान, यावर आता राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. (Latest Marathi News)

Dhananjay Munde On Onion Rate :
Ambadas Danve News: देश शेतकऱ्यांचा आहे, की कारखानदारांचा ? दानवे मोदी सरकारवर भडकले..

मुंडे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, "तात्काळ आपण या ठिकाणी नाफेडच्या माध्यमातून खरेदी चालू करावी. यापूर्वी अकरा रूपये - पंधरा रूपये प्रमाणे खरेदी झालेली आहे. आज ऐतिहासिक भावाने आज नाफेडच्या माध्यमातून केंद्र सरकारने आता पर्यंत तीन लाख टन कांद्यांची खरेदी केली आहे. इथून पुढेही २ लाख टन कांद्यांची जी खरेदी होणार आहे."

"२ हजार ४१० रूपयाने खरेदी केला जाणार आहे. मी देशाचे प्रधानमंत्र्यांचे, मंत्री पियुष गोयल यांचे मनापासून धन्यवाद देतो. त्यांना अशीही विनंती केली आहे की, दोन टन पेक्षाही अधिक कांदा बाजारात आला तर तो याच भावाने खरेदी करावी, याला सुद्धा त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला," असे मुंडे म्हणाले.

Dhananjay Munde On Onion Rate :
Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना केंद्राचा दिलासा; 'या' दराने खरेदी करणार दोन लाख मेट्रिक टन कांदा

दरम्यान, कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार दोन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती फडणवीसांनी ट्विटद्वारे दिली आहे. फडणवीसांनी म्हणाले, "महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पियुष गोयल यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com