Bharat Jodo Nyay Yatra : शरद पवार अन् राहुल गांधी इंडिया आघाडीत 'असा' भरणार हुंकार!

Rahul Gandhi, Sharad Pawar : राहुल गांधी शरद पवार संजय राऊत यांसह राज्यभरातील नेत्यांची चांदवडच्या शेतकरी मेळाव्याला हजेरी.
Sharad Pawar, Rahul Gandhi
Sharad Pawar, Rahul GandhiSarkarnama

Nashik Political News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत चांदवड येथे कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा होत आहे. या शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते हजेरी लावणार आहेत. त्यामुळे शेतकरी प्रश्नावर भाजपवर थेट हल्ला करणारा हा मेळावा निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा 12 मार्चला नंदुरबार येथे महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. त्यानंतर 17 मार्चला मुंबईत तिचा समारोप होईल. राहुल गांधी 13 मार्चला सायंकाळी मालेगाव येथे रोड शो करून मुक्काम करणार आहेत. त्यानंतर सकाळी नऊलाच त्यांचा दौरा सुरू होईल. सकाळी नऊला चांदवड येथील बाजार समितीच्या आवारात कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा मेळाव्याचे आयोजन केले आहे. कांदा निर्यातबंदी आणि द्राक्षासह इतर शेतमालाचे कोसळलेले भाव हा अतिशय जिव्हाळ्याचा आणि शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागलेला आहे. त्यामुळे या मेळाव्याची विरोधी भाजपला चिंता सतावत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar, Rahul Gandhi
Eknath Shinde Shivsena : ठाण्याची ठाणेदारी की कल्याणची सुभेदारी! शिंदेंचे घोडे नेमके अडले कुठे ?

या मेळाव्याला गांधी यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar), शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांसह इंडिया आघाडीचे विविध प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आयोजक अतिशय सतर्क आहेत. मेळावा यशस्वी करण्यासाठी चांदवड तसेच परिसरातील तालुक्यांमध्ये काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल तालुका अध्यक्ष संजय जाधव यांचा विविध पदाधिकारी सक्रिय आहेत.

Sharad Pawar, Rahul Gandhi
Sangli Lok Sabha Election 2024 : सांगलीत मराठा समाज आक्रमक; लोकसभेसाठी 100 किंवा 500 नाही तर तब्बल...

गांधी यांचा दौरा अतिशय व्यस्त असल्यामुळे संबंधितांना वेळापत्रकाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. मेळाव्यासाठी पदाधिकाऱ्यांचे जोरदार दौरे सुरू आहेत. सकाळी नऊला हा मेळावा सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना हा संदेश देण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी दिवसरात्र एक करीत आहेत.

दिंडोरी (Dindori) लोकसभा मतदारसंघ कांदा आणि द्राक्ष उत्पादकांचा परिसर आहे. या मतदारसंघात कांदा निर्यात बंदी आणि त्यामुळेच कोसळलेले द्राक्षाचे भाव यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. भारतीय जनता पक्षाच्या (BJP) केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना हा फटका बसला आहे. त्याविषयी शेतकऱ्यांमध्ये अतिशय तीव्र भावना आहेत. या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत असल्याने हा राज्यातील शेतकऱ्यांचा प्रतिनिधिक मेळावा म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात येत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष व त्यांचे कार्यकर्ते सतर्क आहेत. कांदा निर्यात बंदीचे तीव्र पडसाद या भागातून म्हटले आहेत. येथील सर्व आमदार सत्ताधारी भाजपला पाठिंबा देणारे असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये त्याबाबतचा रोज वाढत आहे. राहुल गांधी यांच्या दौऱ्याने शेतकऱ्यांच्या या समस्या राजकीय मुद्दा म्हणून पुढे आणला जाईल. त्या दृष्टीने राहुल गांधी आणि इंडिया गाडीचे नेत्यांमुळे चांदवड येथे होणारे शेतकरी मेळावा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडणारा व राजकीय हवा देणारा ठरू शकतो.

(Edited by Sunil Dhumal)

Sharad Pawar, Rahul Gandhi
Beed Lok Sabha Constituency : बीड लोकसभेच्या उमेदवाराबाबत गोंधळ; युतीसह आघाडीत नेमकं काय सुरू?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com