Tanaji Sawant News : पश्चिम महाराष्ट्रासारखी उस्मानाबादची प्रगती करणार..

Marathwada : जिल्ह्याच्या विकासाभिमूख कामासाठी निधी कमी पडू देणार नाही
Tanaji Sawant News, Osmanabad
Tanaji Sawant News, OsmanabadSarkarnama
Published on
Updated on

Osmanabad News : राज्याचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे आपल्या एकाधिकारशाही कारभारासाठी ओळखले जातात. आर्थिक सुब्बतेच्या जोरावर राजकारणात दाखल झालेल्या सावंत यांनी सहकार क्षेत्रातही दमदार वाटचाल सुरू केली आहे. काल शिवजंयती निमित्त झालेल्या कार्यक्रमात त्यांनी आणखी एक घोषणा करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

Tanaji Sawant News, Osmanabad
Ashok Chavan News : माझ्याबाबतीत घातपाताची शक्यता, मंत्रीपदाच्या काळातील लेटरहेडचाही गैरवापर..

उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याची प्रगती आपण पश्चिम महाराष्ट्रासारखी करू, असा दावा त्यांनी केला आहे. त्यासाठी लागेल तेवढा निधी सरकारकडून उपलब्ध करून देवू, अशी ग्वाही देखील सावंत यांनी दिली. (Marathwada) पश्चिम महाराष्ट्रातील विकासाची तुलना नेहमीच केली जाते, मराठवाड्याच्या बाबतीत तर ती होतेच होते. मराठवाडा मागसलेला, दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो.

या भागाला राज्याचे प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली, तरी हे मागसलेपण, दुष्काळ कमी झाला नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पुढाऱ्यांची इच्छा शक्ती आणि मराठवाड्यातल्या नेत्यांची अशी तुलना देखील कायम केली जाते. प्रा. तानाजी सावंत तसे सोलापूर जिल्ह्यातले, पण उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांडा या विधानसभा मतदारसंघातून ते राजकारण करतात.

साखर कारखानदारीच्या जोरावर त्यांनी राजकारणातही आपला जम बसवला. एवढेच नाही तर दोनदा कॅबिनेट मंत्री देखील झाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेकडून मंत्री राहिललेले सांवत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पुन्हा मंत्री झाले. काल उस्मानाबाद जिल्ह्यात शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी जिल्ह्याच्या विकासावर बोलतांना पश्चिम महाराष्ट्राचे उदाहरण दिले.

उस्मानाबादची प्रगती आपल्याला पश्चिम महाराष्ट्रासारखी करायची आहे. जिल्ह्याच्या विकासाभिमूख कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी उस्मानाबादकरांना स्वप्न दाखवले आहे. आता ते सत्यात उतरणार ? की मग भाषणातील टाळ्या मिळवणारे वाक्य ठरणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com