Telangana News : मुख्यमंत्री केसीआरच्या पक्षाची चव्हाणांच्या नांदेडातून महाराष्ट्रात एन्ट्री...

Marathwada : सीमाप्रश्नावरून वातावरण तापलेले असतांना आता तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी देखील राजकीय खेळी सुरू केली आहे.
Cm. k.Chandrashekar Rao-Ashok Chavan New, Nanded
Cm. k.Chandrashekar Rao-Ashok Chavan New, NandedSarkarnama
Published on
Updated on

Nanded : काही वर्षांपुर्वी हैदराबादच्या ओवेसी बंधुंच्या एमआयएमने नांदेडमधून महाराष्ट्रात (Maharashtra) आपला प्रवेश केला होता. त्यानंतर या पक्षाने राज्यात आपली ताकद वाढवली. स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणूका लढवत एमआयएम आपले पाय रोवू पहात आहे. आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत (Telengana) तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हा पक्ष महाराष्ट्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत आहेत.

Cm. k.Chandrashekar Rao-Ashok Chavan New, Nanded
Sanjay Shirsat News : मुख्यमंत्र्यांसाठी शिरसाट-भुमरे दोघांच्या गाड्या, पण...

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची ५ फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या जय्यत तयारीसाठी तेलंगणाचे कायदा व वनमंत्री ए. इंद्रकरण रेड्डी हे आपल्या पक्षाच्या आमदार, खासदारांसह (Nanded) नांदेड दौऱ्यावर आहेत. (Ashok Chavan) यावेळी त्यांनी ज्या ठिकाणी केसीआर यांची सभा होणार आहे, त्याठिकाणी भुमीपूजन करत तयारी देखील सुरू केली आहे. नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागाताली काही गावांनी तेलंगणामध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून वातावरण तापलेले असतांना याच मुद्यांवरून आता तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी देखील राजकीय खेळी सुरू केली आहे. एमआयएमनंतर आता केसीआर यांच्या बीआरएस पक्षाची राज्यात एन्ट्री होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधून जेव्हा एमआयएमने राज्याच्या राजकारणात पहिले पाऊल टाकले होते, तेव्हा या पक्षाला हलक्यात घेण्याची चूक राज्यातील नेत्यांनी केली होती.

पुढे हाच पक्ष सगळ्यांसाठी डोकेदुखी ठरला. एमआयएमने नांदेड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत विक्रमी मते घेत चव्हाणांच्या पराभवाला हातभार लावला होता. आता केसीआरचा बीआरएस पक्ष देखील महाराष्ट्रात नशीब आजमावण्यासाठी येत असल्याने राज्याच्या राजकारणात नवा स्पर्धक निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या ५ फेब्रुवारी रोजी नांदेडच्या गुरुद्वारा मैदानावर के. चंद्रशेखर राव यांची सभा होणार आहे.

नांदेडमध्ये आलेल्या तेलंगणाच्या मंत्री, खासदार, आमदारांनी या सभास्थळाची पाहणी करून आज भुमीपूजन देखील केले. केसीआर यांची सभा यापुर्वीच घेण्याचे ठरले होते. परंतु विधान परिषदेच्या निवडणूक आचारसंहितेमुळे ही सभा पुढे ढकलण्यात आली होती. तीच सभा आता ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. नांदेडमध्ये दाखल होताच केसीआर गुरुद्वाराचे दर्शन घेवून पुढील कार्यक्रमांना सुरूवात करणार आहेत. स्थानिक नेत्यांशी चर्चा, बैठक आणि सभा असा त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम असणार आहे.

Cm. k.Chandrashekar Rao-Ashok Chavan New, Nanded
Aimim : मैदानात कोणीही येवू द्या, पुन्हा मीच खासदार ; इम्तियाज यांचा दावा पटतो का ?

अब की बार किसान सरकार, असा नारा देत आमचे सरकार फक्त शेतकऱ्यांसाठी असेल अशी भूमिका केसीआर यांनी याआधीच जाहीर केली होती. तेलंगणा राज्यात जशा सुविधा शेतकऱ्यांना मिळतात तशाच महाराष्ट्र व देशातील इतर राज्यांमधील शेतकऱ्यांना मिळाव्यात, अशी आपली इच्छा असल्याचे ते सांगतात. एमआयएम, आम आदमी पार्टी या पक्षांनी प्रस्थापितांना धक्के दिले आहेत. त्यानंतर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा पक्ष महाराष्ट्रात कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com