Paranda Assembly Election : धाराशिवमध्ये टेन्शन वाढले; 'या' मतदारसंघात होणार फेरमतमोजणी, 18 मशिनची भरली रक्कम

Political News : लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणचे उमेदवारानी फेरमतमोजणीची मागणी करीत सर्वोच्च न्यायालयात न्याय मागण्याची चाचपणी सुरु केली आहे.
Bhum-Paranda Assembly election 2024
Bhum-Paranda Assembly election 2024 Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आता लवकरच राज्यात महायुतीचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यासाठी महायुतीमधील घटक पक्ष जोरदार तयारी करीत असताना दुसरीकडे मात्र, इव्हीएमवर शंका उपस्थित केली जात असून आता शरद पवार गटाने थेट मैदानातच उडी घेतली आहे. धाराशिवमधील परंडा मतदारसंघातील 18 मशिनवरील फेरमतमोजणीसाठी मोठी रक्कम भरली आहे. त्यामुळे या फेरमतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Paranda Assembly Election)

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे विरोधकांकडून आरोप केले जात आहेत. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणचे उमेदवारानी फेरमतमोजणीची मागणी करीत सर्वोच्च न्यायालयात न्याय मागण्याची चाचपणी सुरु केली आहे.

Bhum-Paranda Assembly election 2024
BJP CM News : भाजपामध्ये एकही महिला मुख्यमंत्रिपदासाठी योग्य नाही का? अखेर ठाकरेंच्या 'फायरब्रँड' नेत्यानं वात पेटवलीच

विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यातील काही गावात, मतदान केंद्रावर मतदानात तफावत असल्याचा, मतदार आणि मतदानाची संख्या जुळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याविरोधात शरद पवार (Sharad Pawar) गट आक्रमक झाला आहे. थेट त्यांनी मैदानातच उडी घेतली आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघात फेरमतमोजणीसाठी शरद पवार गटाने मोठी रक्कम भरली आहे.

Bhum-Paranda Assembly election 2024
BJP Politics : शिंदेंची भाजपकडून आणखी कोंडी, चार मंत्र्यांच्या समावेशाला आक्षेप

परंडा मतदारसंघातील चुरशीच्या निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार राहुल मोटे यांचा दीड हजार मताने निसटता पराभव झाला. त्यामुळे त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे. त्यासाठी 8.5 लाख रुपये त्यांनी निवडणूक विभागाकडे भरले आहेत. 18 मशीनची पुन्हा फेर मतमोजणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे राहुल मोटे यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. अपेक्षित मतदान न मिळालेल्या यंत्रावरील मतांची फेरमोजणी करण्याची मागणी मोटे यांनी केली आहे.

Bhum-Paranda Assembly election 2024
Mahadev Jankar : ...म्हणून महायुतीतून बाहेर पडलो; राज्यात सत्तास्थापनेवरून मोठं घमासान सुरू असतानाच महादेव जानकरांचा मोठा गौप्यस्फोट

परंडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली होती, मतमोजणीच्या वेळी शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या या निवडणुकीत तानाजी सावंत यांनी 1509 मताने निसटता विजय मिळाला होते. तानाजी सावंत यांना 1 लाख तीन हजार 254 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोटे यांना 1 लाख 1 हजार 745 एवढे मतदान झाले होते. त्यानंतर मोटे यांनी फेर मतमोजणीसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. फेरमतमोजणी झाल्यानंतर काय चित्र राहणार याकडे मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे.

Bhum-Paranda Assembly election 2024
Election Commission: दारुण पराभवानंतर 'ईव्हीएम'विरोधात रान पेटवणाऱ्या काँग्रेसला मोठा दिलासा; आयोगानं घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com