Thackeray Group: Video ठाकरे गट अन् भाजप कार्यकर्ते भिडले; अंबादास दानवे यांना पोलिसांनी घेरलं

Aaditya Thackeray Visit Sambhajinagar Today : विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांना पोलिसांनी घेरलं आहे. हॉटेल रामासमोर ही हाणामारी झाली. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने जालना रोड परिसरात तणावाचं वातावरण होते.
Aditya Thackeray visit  Sambhajinagar Today
Aditya Thackeray visit Sambhajinagar TodaySarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhaji Nagar News :ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आज छत्रपती संभाजीनगर येथे दौरा आहे. या दौऱ्याला विरोध करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांना पोलिसांनी घेरलं आहे. हॉटेल रामासमोर ही हाणामारी झाली.

काल (रविवारी) छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते, त्यांचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले. आज भाजपकडून आदित्य ठाकरे यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले.

Aditya Thackeray visit  Sambhajinagar Today
Aditya Thackeray : वरळीत भाजपकडून दहीहंडीचं आयोजन; आदित्य ठाकरेंना झालाय आनंद...

दोन्ही गटात हाणामारी झाली आहे. पोलिसांनी मध्यस्थी करुन वाद मिटवण्याचा प्रयत्न केले. दोन्ही गटातील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने जालना रोड परिसरात तणावाचं वातावरण होते. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

आदित्य ठाकरे यांना काळे झेंडे दाखवून भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. दिशा सालीयनचे पोस्टर भाजप कार्यकर्त्यांच्या हातात होते. रामा हॉटेलच्या बाहेर ठाकरे यांच्याविरोधात ते घोषणा देत होते. तेव्हा ठाकरे गटाचे कार्यकर्ते तेथे आले. दोन्ही गट आमने-सामने आल्याने गोंधळ उडाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com