Aditya Thackeray : वरळीत भाजपकडून दहीहंडीचं आयोजन; आदित्य ठाकरेंना झालाय आनंद...

Aditya Thackeray criticism of BJP Worli program : आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून दहीहंडी उत्सवाचं आयोजन केले जात असून, त्यावर आदित्य ठाकरेंनी खोचक प्रतिक्रिया दिली.
Aditya Thackeray
Aditya Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात भाजपने मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. यावर आदित्य ठाकरे यांना आनंद झाला आहे. तशी त्यांनी भाजपला खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

"इलेक्टोरल बॉण्डचा पैसे कमवले आहे, ते कुठेतरी खर्च केला पाहिजे. यानिमित्ताने लोकांपर्यंत पैसा जात असल्याचा आनंद आहे", असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी भाजपला लगावला.

सणांना सुरवात येत आहे. वरळीमध्ये भाजपने (BJP) मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. मोठं बक्षिसं ठेवली आहेत, यावर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंना विचारलं असताना, त्यांनी भाजपला खोचकपणे डिवचलं आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, "इलेक्टोरल बॉण्डमधून एवढे पैसे कमवले आहेत की, ते कोठेतरी खर्च झाले पाहिजे. यानिमित्ताने लोकापर्यंत जात आहे, त्याचा आनंद आहे. दोन वर्षात जांभोरी मैदान आम्ही नीट करून घेतलं होते. क्रिकेटच्या मैदानापासून ते ज्येष्ठांना बसण्यासाठी तयार केलेल्या कट्ट्यापर्यंत भाजपने सर्व मैदानाची वाट लावली आहे. यात स्थानिकांन खूप त्रास झाला आहे. यावर आता काही बोलणार नाही. सरकार आल्यानंतर नक्कीच दखल घेऊ".

Aditya Thackeray
Shivsena News : मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का! आणखी एक महिला नेत्या शिंदे गटात प्रवेश करणार

अफजल खानाचा वधाचा देखावा जांभोरी मैदानातील दहीहंडी उत्सवात ठेवला आहे. "अफजल खानासारखेच चालूनच येत आहेत. त्यांच्याच बद्दल ते बोलत आहे", असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

Aditya Thackeray
Uddhav Thackeray : 'शक्ती' कायद्यावरील धूळ झटका; उद्धव ठाकरेंचे राष्ट्रपतींना आवाहन

वरळी मतदारसंघात मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गट उमेदवार देत आहेत, त्यावर आदित्य ठाकरे यांनी खुमासदार प्रतिक्रिया दिली. "महाराष्ट्र 288 जागा आहेत. अमेरिकेची निवडणूक, त्यानंतर वरळीची निवडणूक आणि त्यानंतर 287 जागांची नंतर चर्चा होईल", असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

भाजप विकृतीच्या बाजूनं

बदलापूर अत्याचार घटनेवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, "यात गुन्हा दाखल करण्यास सहा दिवस का लागले. पोलिसांवर दबाव कोणाचा होता. काही घटना घडल्या की, पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करतो, निलंबित करतो, परंतु राजकीय दबाव कोणाचा होता? ती शाळा कोणाची आहे, शाळेचे ट्रस्टी पुढे आले आहेत का? फिर्याद घेतली त्यादिवशी महिलेला दहा तास बसवून ठेवले. ती गरोदर होती". कालचं महाविकास आघाडीचे आंदोलन विकृती विरोधात होते आणि भाजपचे आंदोलन विकृतीच्या बाजून होते, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com