Latur Political News : पीकविम्यासाठी ठाकरे गट काढणार सत्ताधारी मंत्री, आमदारांच्या घरावर मोर्चा..

Affected Farmers News : नियमानुसार २१ दिवस सतत पावसाचा खंड असल्यास पंचवीस टक्के आगाऊ पीकविमा रक्कम देण्याच्या निर्णय घ्यावा.
Latur Political News
Latur Political NewsSarkarnama

Marathwada Political : राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे हा भाग पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा ठाकला आहे. (Crop Insurance News) सत्ताधाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, अशी आश्वासने दिली जात असली तरी आर्थिक मदत, पिक विमा, अनुदान हे प्रश्न मात्र जैसे थे आहेत. मराठवाड्यातील प्रत्येक, जिल्ह्यात आणि तालुक्यात हीच परिस्थिती आहे.

Latur Political News
DCM Devendra Fadanvis News : विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा नंबर वन ; फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिले श्रेय..

पावसाअभावी शेतकऱ्यांची कापूस, सोयाबीन ही पिके आणि काही भागातील फळबागांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. (Abhimanyu Pawar) एकीकडे शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा ही योजना सरकारकडून राबवली जात आहे. तर दुसरीकडे उतरवलेल्या पिकांचा विमा देखील शेतकऱ्यांना मिळत नाहीये. याच मुद्यावर आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे.

लातूर जिल्ह्यासह औसा आणि निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीकविम्याच्या प्रश्नावर सत्ताधारी आमदारांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरावर मोर्चा काढून घेराव घालण्याची घोषणा करण्यात आली आहे. (Latur) लातूर जिल्ह्यात गेल्या ३३ दिवसापासून पावसाचा खंड असल्याने शेतकऱ्यांना पीकविमा आगाऊ रक्कम देण्यात यावी अन्यथा (Smbhaji Patil Nilangekar) आमदार संभाजी पाटील निलंगेकर व औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या घरावर मोर्चे काढून त्यांना घेराव घालण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी दिला.

जिल्ह्यात दुष्काळाचे नैसर्गिक सावट निर्माण होऊन सोयाबीन, तूर, मूग, उडीद यासारखी नगदी पिके पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे धोक्यात आली आहेत. तरीही `शासन आपल्या दारी` म्हणणाऱ्या राज्य सरकारकडून कसल्याही प्रकारची मदत शेतकऱ्याला केली जात नाही. यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने या अगोदरही जिल्हाधिकारी लातूर यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी करण्यात आली आहे. यानंतर शासनाला जागे करण्यासाठी सत्ताधारी आमदार संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार यांच्या घरावर मोर्चा काढून घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नुकताच ज्यांचा मंत्रीमंडळात समावेश झाला ते क्रिडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, अशी मागणी देखील माने यांनी पत्रकार परिषदेत केली. १४ सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर १५ रोजी संभाजीपाटील निलंगेकर यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येईल. तर दुसऱ्या दिवशी १६ रोजी अभिमन्यू पवार यांच्या घरावर मोर्चा धडक देऊन घेराव घालण्यात येईल, असे माने यांनी सांगितले. यानंतरही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, तर मंत्री संजय बनसोडे यांना सुद्धा घेराव घातला जाईल. यासाठी शासनाने तात्काळ सरसकट शेतकऱ्यांना नियमानुसार २१ दिवस सतत पावसाचा खंड असल्यास पंचवीस टक्के आगाऊ पीकविमा रक्कम देण्याच्या निर्णय घ्यावा, अशी मागणीही माने यांनी केली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com