MP Nageshpatil Ashtikar News : ठाकरेंचे खासदार भडकले, नांदेड विमानतळावर गोंधळ

Thackeray group MP Nagesh Patil Ashtikar angry at Nanded airport : खासदारांची गाडी रोखत म्हणजे काय ? हाच न्याय भाजपच्या नेत्यांना लावता का ? नांदेड विमानतळातील काही अधिकारी, कर्मचारी हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागतात. आमच्या बाबतीत नेहमीच असा प्रकार का घडतो?
Uddhav Thackeray, Nagesh patil Ashtikar
Uddhav Thackeray, Nagesh patil Ashtikar Sarakaranma
Published on
Updated on

Shivsena UBT Marathwada News : लोकसभेच्या हिंगोली मतदारसंघाचे विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची गाडी नांदेड विमानतळाच्या गेटवरच अडवण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला. नुकतेच खासदार झालेल्या आष्टीकरांचा यामुळे पारा वाढला आणि नेत्यांच्या स्वागतासाठी आलेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणबाजी करत विमानतळ दणाणून सोडले.

खासदारांची गाडी रोखत म्हणजे काय ? हाच न्याय भाजपच्या नेत्यांना लावता का ? नांदेड (Nanded) विमानतळातील काही अधिकारी, कर्मचारी हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागतात. आमच्या बाबतीत नेहमीच असा प्रकार का घडतो? असा संताप व्यक्त करत आष्टीकर यांनी पोलिस अधिक्षकांना फोन लावून नाराजी व्यक्त केली. हा गोंधळ बराच वेळ विमानतळासमोर सुरू होता.

पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळात घोषणाबाजी करणाऱ्या शिवसैनिकांना बाजूला नेले. खासदार आष्टीकरांचीही समजूत काढली, पण त्यांचा राग बराच वेळ शांत झाला नव्हता. आगामी विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे नांदेड दौऱ्यावर होते. नांदेड विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी खासदार नागेश पाटील आष्टीककर शिवसैनिकांसह पोहचले होते.

Uddhav Thackeray, Nagesh patil Ashtikar
Nanded Loksabha Constituency News : नांदेड पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस चव्हाण कुटुंबातीलच उमेदवार देणार

यावेळी पोलिसांनी त्यांची गाडी विमानतळाच्या गेट बाहेरच रोखली. यावरून आष्टीकर आणि पोलिसांमध्ये बराचवेळ वाद झाला. (Shivsena) संतापलेल्या आष्टीकरांनी पोलिसांना हा न्याय सगळ्यांना लावता का? की फक्त विरोधी पक्षाच्या खासदार, नेते, पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत हे आदेश आहेत ? असा सवाल केला. आमचे नेते संजय राऊत नांदेड दौऱ्यावर आले आहेत, त्यांचे स्वागत करून त्यांना नेण्यासाठी आणलेली गाडीच पोलिसांनी अडवली, असा आरोप आष्टीकर यांनी केला.

शिवसेनेचे नेते येणार असल्याने शिवसैनिक मोठ्या संख्येने विमानतळावर आले होते, खासदार आष्टीकरांची गाडी अडवल्याचे समजताच ते आक्रमक झाले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे विमानतळावरील वातावरण चांगलेच तापले. पोलिस अधिक्षकांनी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना फोनवरून सूचना केल्या, त्यानंतर परिस्थिती शांत झाली.

Uddhav Thackeray, Nagesh patil Ashtikar
Video Shivsena UBT : आमदाराच्या बॉडीगार्डकडून बेदम मारहाण, व्हिडिओ दाखवत ठाकरे गटाचा शिंदेंवर आरोप

दरम्यान, आष्टीककर यांनी पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप करत ते भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचे म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघातून नागेश पाटील आष्टीकर यांनी विजय मिळवला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबुराव कदम यांचा त्यांनी 4 लाख 92 हजार 535 मते घेत पराभव केला होता. 2009 मध्ये ते हदगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष होते.

2013 मध्ये शिवसेनेचे हदगाव तालुका प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 2014 मध्ये हदगांव विधानसभा मतदारसंघातून आष्टीकर यांनी निवडणूक लढवली होती. माधवराव पाटील जवळगावकर यांचा त्यांनी पराभव केला होता. 2019 मध्ये मात्र जवळगावकर यांनी या पराभवाची परतफेड करत आष्टीकरांना पराभूत केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com