Ashok Chavan Resignation : चव्हाणांच्या राजीनाम्यावर खासदार जाधव भडकले; म्हणाले, 'मोठ्या नेत्यांनीच शेण खाल्ले...'

Parbhani Loksabha Constituency : ठाकरे गटाचे उपनेते खासदार संजय जाधव यांनी संतप्त सवाल उपस्थित केला.
MP Sanjay Jadhav and Ashok Chavan
MP Sanjay Jadhav and Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : "भारतीय जनता पार्टीचे सरकार आम्हाला छळत आहे. तसेच सामान्य लोकांनाही छळतंय, हे आपण बघत आहोत. एकतर आमच्या पक्षात ये नाहीतर ईडी, इन्कमटॅक्सची खोटीनाटी कारवाई करून त्याला जेल मध्ये घाल. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी पक्षातून राजीनामा दिल्याची बातमी येत आहे. अशा पद्धतीने मोठ्या लोकांनीच शेण खाल्ल्यावर सामान्य माणसांनी काय करायचे ?", असा संतप्त सवाल ठाकरे गटाचे उपनेते खासदार संजय जाधव यांनी उपस्थित केला. (MP Sanjay Jadhav On Ashok Chavan Resignation)

"देशावर भीषण संकट आहे. दुनिया आशेवर जगते. मात्र ज्यांच्याकडून त्या बाळगायच्या त्यांनीच बेईमानी केल्यावर कोणाकडून अपेक्षा ठेवायची. त्यामुळे सामान्य माणूस हैराण असून असं काय घडतयं की कोणीही उठतोय आणि तिकडे पळतोय", अशी उद्विगनताही जाधव यांनी बोलून दाखवली. पण बेईमानी केल्यावर त्याची फळ भोगावीच लागतात.

सत्ताधाऱ्यांना खोटं बोल पण रेटून बोल हेच धोरण आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारासाठी बाहेर पडलो असे एकनाथ शिंदे सांगतात. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये अडीच वर्षे मंत्रिपद भोगले तेव्हा कसे चालले. केवळ मुख्यमंत्रिपदासाठी त्यांनी पक्ष सोडला, असा आरोपही जाधव यांनी मुख्यमंत्र्यांवर केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MP Sanjay Jadhav and Ashok Chavan
Ashok Chavan Resignation : भाजपच्या श्वेतपत्रिकेत नाव आलं अन् चव्हाणांनी काँग्रेस सोडली!

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी तडकाफडकी आमदारकी आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने मराठवाड्याच्या राजकारणातही मोठा भूकंप आला. महाविकास आघाडी म्हणून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस ताकदीने पुढे जात होती. अशोक चव्हाण या महाविकास आघाडीचा महत्वाचा भाग होते. कालपर्यंत जागावाटपाच्या सगळ्या बैठकांना ते उपस्थितीत होते आणि आज अचानक त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. याचा धक्का आघाडीतील मित्रपक्ष शिवसेनेला सर्वाधिक बसला आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि 2024 चे संभाव्य उमेदवार संजय जाधव यांनाही चव्हाण यांच्या या निर्णयाचा धक्काही बसला आणि संतापही आला. यातूनच त्यांनी अशोक चव्हाण यांच्या निर्णयावर तिखट प्रतिक्रिया दिली.

कितीही त्रास झाला तरी मी पक्ष सोडणार नाही. एकवेळ राजकारण सोडेन पण पक्ष सोडणार नाही. काँग्रेसचे पाथरी विधानसभेचे आमदार सुरेश वरपूडकर हे इकडे तिकडे गेले नाही तर आणखी एकदा विजयी होतील. अन्य कुठे गेले तर मात्र सांगता येत नाही, असे म्हणत त्यांनी काँग्रेसच्या जिल्ह्यातील इतर आमदार,पदाधिकाऱ्यांना सावध केले.

अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या राजीनामा दिल्याने काँग्रेसचे मुख्य प्रतोद तथा पाथरी विधानसभेचे आमदार सुरेश वरपूडकर हेही नाॅटरिचेबल आहेत. अशोक चव्हाण यांच्यासोबत मराठवाड्यासह राज्यातील अनेक आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. अशावेळी वरपडूकरांचे नाॅटरिचेबल राहणे संशायास्पद वाटते. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या निर्णयाचा फटका ठाकरे गटाचे संजय जाधव यांनाही बसण्याची शक्यता आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

MP Sanjay Jadhav and Ashok Chavan
Ashok Chavan Resignation : उद्या बरंच काही होणार; बावनकुळेंनी दिले मोठ्या घडामोडीचे संकेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com