Ashok Chavan Resignation : उद्या बरंच काही होणार; बावनकुळेंनी दिले मोठ्या घडामोडीचे संकेत

Chandrashekhar Bawankule : भाजपमध्ये उद्या मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश, काँग्रेसचे अनेक मोठे नेते संपर्कात असल्याचा बावनकुळेंचा दावा
Ashok Chavan, Chandrashekhar Bawankule
Ashok Chavan, Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics News : ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडालीय तर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्या बऱ्याच घडामोडींचे संकेत दिल्यामुळे 'ये तो झांकी हैं पिक्चर अभी बाकी आहे', अशी राज्यातील स्थिती आहे.

Ashok Chavan, Chandrashekhar Bawankule
Ashok Chavan Resignation : अशोक चव्हाणांनी राजीनामा का दिला ? स्वत: दिली मोठी माहिती

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा ही राज्याच्या राजकारणातील आजची सर्वात मोठा घटना आहे. यापूर्वी अशोक चव्हाण भाजपमध्ये (BJP) जाणार, अशी चर्चा अनेकदा झाली आणि प्रत्येकवेळी चव्हाणांनी ती चर्चा अफवाच असल्याचे स्पष्ट केले होते.

दरम्यान, काँग्रेसमध्ये (Congress) प्रचंड अस्वस्थता असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे. आधी मिलिंद देवरा, त्यानंतर बाबा सिद्दीकी आणि आता अशोक चव्हाण बाहेर पडले, याचा अर्थ काय, असा सवाल बावनकुळे यांनी केला आहे. त्याचवेळी काँग्रेसचे अनेक मोठ-मोठे नेते भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावाही बावनकुळे यांनी केला.

विशेष म्हणजे 23 डिसेंबर रोजी नांदेडमध्ये असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढील महिन्यात नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होईल, असे सांगितले होते. एवढंच नाही तर भाजपचा दुपट्टा कुणी घालायला तयार असेल तर स्वागत आहे, असेही सांगितले होते. त्यावेळीही अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानंतर दीड महिन्यात घडामोड घडली आणि अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडत आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे अशोक चव्हाण आता भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होत आहे. पण सध्या भाजपमध्ये जाण्याचा विचार केला नाही आणि दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करू, असे अशोक चव्हाण यांनी माध्यमांना सांगितले.

तरीही काँग्रेस सोडण्याचा निर्णय तुमच्या मनात केव्हा आला, या प्रश्नावर अशोक चव्हाणांनी दिलेले उत्तर खूप सूचक होते, 'हर चीज बताई नही जा सकती!' काँग्रेस सोडणार नाही म्हणणाऱ्या अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आणि भाजपमध्ये जाण्याचा सध्या तरी विचार नाही म्हणणाऱ्या अशोक चव्हाणांचे वरील विधान खूप काही सांगून जाते.

(Edited by Avinash Chandane)

Ashok Chavan, Chandrashekhar Bawankule
Ashok Chavan : 'कोण कशासाठी कुठे गेले...'; नाना पटोलेंचा अशोक चव्हाणांवर निशाणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com