Shivsena News : एमआयएमला ठाकरे गटाचे प्रत्युत्तर, नामांतराच्या समर्थनार्थ विभागीय आयुक्तांना पत्र..

Marathwada : एमआयएमने या नामांतराला विरोध दर्शवत यासाठी आक्षेप अर्ज भरून घेण्याची मोहिम सुरू केली आहे.
Shivsena Momvment News, Chhatrapati Sambhajinagar
Shivsena Momvment News, Chhatrapati SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नामांतरविरोधी आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाने देखील एक मोहिम हाती घेतली आहे. `आय लव्ह छत्रपती संभाजीनगर` असे फलक आणि या नामकरणाच्या निर्णयाला समर्थन म्हणून विभागीय आयुक्तांना पत्र पाठवण्यात येत आहे. जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी (Kishanchand Tanwani) यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेचा आज शुभारंभ करण्यात आला.

Shivsena Momvment News, Chhatrapati Sambhajinagar
Eknath Khadse News : महापालिकांमधील नामनिर्देशीत सदस्य संख्येत वाढ भ्रष्टाचारासाठी ?

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाने शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा ठराव मंजूर केला होता. (Shivsena) त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने या नामकरणाचा सुधारित ठराव केंद्राला पाठवला होता. त्याला केंद्राने मंजुरी दिली असली तरी एमआयएम (Aimim) व काही सामाजिक, राजकीय संघटनांकडून या विरोधात आंदोलन सुरू आहे.

एमआयएमने या नामांतराला विरोध दर्शवत यासाठी आक्षेप अर्ज भरून घेण्याची मोहिम सुरू केली आहे. आता त्याला प्रत्युतर म्हणून ठाकरे गटाने नामांतराच्या समर्थनार्थ फलक आणि विभागीय आयुक्तांना पत्र पाठवण्याची मोहिम हाती घेतली आहे. जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी गुलमंडी येथे आय लव्ह संभाजीनगर लिहलेल्या फलकांचे वाटप केले. यावेळी नागरिकांना समर्थनासाठीचे मोफत पत्र संपर्क कार्यालयात उपलब्ध करून दिले आहेत. हे पत्र आपल्या सहीनिशी विभागीय आयुक्तांना पाठवण्यात येणार आहे. या पत्रावर शहराच्या नामांतराला आमचा पुर्ण पाठिंबा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

गुलमंडी येथील मोहिमत माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, उपशहरप्रमुख सुगंधकुमार गडवे, युवासेना शहर अधिकारी आदित्य दहिवाल, बंटी जैस्वाल, छोटू घाडगे, सुधीर नाईक, राजू खरे, योगेश अष्ठेकर, धनराज गोरक्षक, अल्पसंख्याक आघाडीचे फिरोज कुरेशी, सय्यद मुश्ताक, अब्दुल गणी पठाण, अजय चावरीया, प्रणव कडपे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com