Shivsena On Prakash Ambedkar News : आंबेडकरांच्या `औरंगजेब कबर` भेटीवर ठाकरे गटाचे मौन ?

Prakash Ambedkar : उद्धव ठाकरे या विषयावर काही बोलतात का? की आंबेडकरांच्या या कबर भेटीकडे कानाडोळा करतात?
Prakash Ambedkar, Uddhav Thackeray News
Prakash Ambedkar, Uddhav Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : प्रबोधनकारांचे हिंदुत्व हेच उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत मैत्रीचा हात पुढे केला. (Shivsena On Prakash Ambedkar News) पक्ष फुटीनंतर अपरिहार्यता म्हणून उद्धव ठाकरे यांनी देखील तो स्वीकारला. त्यामुळे एका मित्रत्व स्वीकारले की ते त्याच्या गुणदोषांसह स्वीकारावे लागते. तसेच काहीसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबती घडले असेच म्हणावे लागेल.

Prakash Ambedkar, Uddhav Thackeray News
Vanchit Bahujan Aghadi Camp News : निमित्त शिबीराचे, पण औरंगजेब कबर, भद्रा मारोतीला भेट देत आंबेडकरांनी उडवला धुराळा..

ज्या औरंगजेबाचा विरोध आणि त्यांच्या नावावर राजकारण करत शिवसेनेने (Shivsena) आतापर्यंत हिंदुत्ववादी मते मिळवली, त्याच औरंगजेबाचे मित्रपक्षाकडून उदात्तीकरण होत असतांना आता मुग गिळून गप्प बसण्याची वेळ आली. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी औरंगजेबाचे पोस्टर आणि त्याचे स्टेटस ठेवण्याच्या प्रकारावर ठाम भूमिका घेतली होते.

यावरुन राज्यात काही पक्ष, संघटना जातीय दंगली घडवू पाहात होत्या, १२ दंगली घडवण्यात येणार होत्या असा दावा देखील आंबेडकरांनी नागपूर एसआयटीच्या अहवालाचा दाखला देत केला. (Uddhav Thackeary) शिवाय औरंगजेबाने ५० वर्ष आपल्यावर राज्य केले, त्या काळात जयचंद प्रवृत्तीचे कोण होते, आता कोण आहेत त्यांचा शोध घ्या, औरंगजेबाच्या दरबारात कोण होते? याचा शोध घेण्याचे आवाहन देखील आंबेडकरांनी टीका करणाऱ्यांना केले.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका भाषणाचा दाखला देखील ते आपल्या भूमिकेचे समर्थन करतांना देतात. मित्रपक्षाची कोंडी होईल, याचा विचार देखील आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट देतांना केला नाही, हे स्पष्ट दिसते. त्यामुळेच यावर काय भूमिका घ्यावी, या संभ्रमात शिवसेना ठाकरे गट सध्या आहे. आदित्य ठाकरे यांनी देखील मी माहिती घेवूनच यावर बोलेन, असे सांगत यावर बोलणे टाळले.

तर ठाकरे गटातील राज्यभरातील नेत्यांना देखील बहुदा आबंडेकरांच्या औरंगजेब कबरीच्या भेटीवर `हाताची घडी तोंडावर बोट`, ठेवण्यास सांगण्यात आल्याची चर्चा आहे. बाळासाहेब आंबेडकरांचे समर्थन करावे, तर हिंदुत्ववादी मतदार नाराज होणार, अन् विरोध करावा, तर वंचितच्या माध्यमातून जवळ येणारी दलित-मुस्लिम मते हातची निसटतील, अशा कात्रीत ठाकरे गट सापडला आहे. आज शिवसेनेचे वरळीत राज्यस्तरीय शिबीर आहे, या शिबीरात उद्धव ठाकरे या विषयावर काही बोलतात का? की आंबेडकरांच्या या कबर भेटीकडे कानाडोळा करतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com