Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी केलेले 'ते' विधान पुन्हा चर्चेत

Poitical News: बीडची लोकसभा नेमके कोण लढवणार ? असा प्रश्न सतावत असताना एका कार्यक्रमप्रसंगी माजी मंत्री पंकजा मुंडेंनी केलेल्या विधानाची चर्चा आता जोरात रंगली आहे.
Pankaja Munde
Pankaja Munde Sarkarnama
Published on
Updated on

Bjp News: बीडची लोकसभा निवडणूक पंकजा मुंडे लढवणार का ? यावरून सध्या चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे बीडची लोकसभा नेमके कोण लढवणार ? असा प्रश्न सतावत असताना एका कार्यक्रमप्रसंगी माजी मंत्री पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्याची चर्चा आता जोरात रंगली आहे. पंकजा मुंडे या नेहमीच 'या' ना 'त्या' कारणाने चर्चेत असतात. मात्र, यावेळेस त्यांनी राजकारणात येणाऱ्या महिलाविषयी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सर्वच पक्ष आता अंग झटकून कामाला लागले आहेत. आष्टी शहरात पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची संवाद बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

याआधीसुद्धा पंकजा मुंडे यांनी वेगवेगळी वक्तव्यं केली होती. ज्यांची चर्चा राज्यभर झाली होती. तर कधी त्यामुळे त्या अडचणीतसुद्धा आल्या होत्या. "मी जनतेच्या मनात असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील माझं राजकारण संपवू शकत नाहीत," असंसुद्धा वक्तव्य काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी केले होते. (Pankaja munde news)

Pankaja Munde
Lok Sabha Election 2024 : झुकणार नाही! जागावाटप होताच काँग्रेसमधील बड्या नेत्याचे बंडाचे निशाण

त्या म्हणाल्या होत्या, 'राजकारणामध्ये आपल्याला वेगळेपण आणायचे आहे. आगामी काळात राजकारणात बदल करावा लागणार आहे. राजकारणामध्ये लोकहिताचे निर्णय होतात. परंतु, अलीकडे राजकारण हे करमणुकीचे साधन होत आहे.' त्यासोबतच 2014 च्या विधानसभेत पंकजा मुंडे या परळी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या.

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांना थेट मंत्रिमंडळात संधी मिळाली. त्यावेळी त्यांनी मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री...! असे म्हणत अडचणी वाढवून घेतल्या होत्या. मात्र, त्याकडे पक्षश्रेष्ठीने गांभीर्याने पाहिले नसल्याने त्यांच्याकडे ग्रामविकास, जलसंधारण आणि महिला बालकल्याण अशी खाती फडणवीस सरकारच्या काळात सोपवली होती.

या वेळी पंकजा मुंडेंनी कोणत्याही आरक्षणाचा निवडणुकांवर परिणाम होणार नाही. राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे. याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर धोकादायक परिणाम होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट करीत आरक्षणावर अधिक भाष्य करणे टाळले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या कार्यक्रमप्रसंगी त्यांनी येणारा काळ महिलांचा असेल, असे म्हणत राजकारणात येणाऱ्या महिलांसाठी येणारा काळ चांगला आहे. कारण येत्या काळात महिलाच या स्पष्ट आणि सत्याचे राजकारण करतील, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. तर येणाऱ्या काळात एकट्याची ताकद जगाला दाखवून द्यावी लागेल, असेदेखील त्या म्हणाल्या. त्यांनी केलेल्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेमका त्यांच्या वक्तव्याचा रोख कुणाकडे होता, हे समजत नाही.

येत्या काळात राजकारणात येणाऱ्या महिलांसाठी मोठी संधी असल्याचे सांगत त्यांनी महिलांची पाठराखण केली असली तरी एकट्याची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे, असे म्हणत नेमका कोणावर निशाणा साधला, याची चर्चा मात्र जोरात सुरू आहे.

एका वृत्तवाहिनीशी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी संवाद साधताना, 'धनंजय मुंडे आणि तुम्ही एकत्र आला आहात, महायुतीत तीन पक्ष एकत्र आल्यामुळे आता एकत्र आहात. यामुळे ही लोकसभा निवडणूक सहज जाईल का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, "धनंजय मुंडेंसोबत (Dhanjay Munde) नसतानाही निवडणूक सहजच होती. जरी कठीण प्रवास असला तरी आम्ही विजय मिळवला होता. खरंतर लोकसभेचा जो मतदार आहे, त्यामध्ये बंधू धनंजयसोबत आला म्हणून त्यात अधिकची वाढ होईल असे वाटत नाही. मात्र, आता एकत्र आलो आहेत तर बघूया काय फरक पडतो,' असेही त्या म्हणाल्या.

या त्यांच्या वक्तव्यावरूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ncp) पदधिकाऱ्यांत नाराजी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांना महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनाविषयी बोलताना काळजी घ्यावी लागणार आहे.

R

Pankaja Munde
Pankaja Munde News : 'धनंजय सोबत नव्हता तेव्हाही जिंकलो, आता फार फरक नाही...'; काय बोलून गेल्या पंकजा मुंडे?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com