Ashok Chavan News : `हवा बहोत तेज चल रहा है`, अशोकराव...

The anger of the Maratha protesters continues : अशोक चव्हाण जिल्ह्यात नव्या जोमाने कामाला लागले आहेत. मुलगी श्रीजया हिला भोकर विधानसभा मतदारसंघातून आमदार करण्याचे त्यांचे मिशन आहे. पण लोकसभा निवडणुकीत लागलेली मराठा आरक्षणाची धग अजूनही कायम असल्याची प्रचिती श्रीजया चव्हाण, अमिता चव्हाण यांना नुकतीच आली.
Ashok Chavan-Shrijaya, Amita Chavan
Ashok Chavan-Shrijaya, Amita ChavanSarkarnama
Published on
Updated on

Nanded BJP Politics News : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीच्या विरोधात वातावरण पहायला मिळत आहे. मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सुरु असलेला संघर्ष अजूनही कायम आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सरकारला तोडगा न काढता आल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हाच मुद्दा महायुतीसाठी कळीचा ठरण्याची शक्यता आहे.

अशा वातावरणात सुप्रसिद्ध सिनेअभिनेते अमिताभ बच्चन यांच्या `अग्निपथ` चित्रपटातील संवाद आठवल्याशिवाय राहत नाही. ` दिनकरराव हवा बहोत तेज चल रहा है, अपनी टोपी संभालो नही तो उड जायेगा`. या डायलाॅगने त्या काळात चांगलाच धुमाकूळ घातला होता. हे आठवण्याचे कारण म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे विद्यमान राज्यसभा खासदार अशोक चव्हाण, (Ashok Chavan) त्यांच्या पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण, भावी आमदार मुलगी श्रीजया चव्हाण यांना त्यांच्याच भोकर मतदारसंघात विरोधाला समोरे जावे लागत आहे.

मराठा आरक्षणाच्या विषयानेच लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा धुळीला मिळवली. लोकसभा निवडणुकीआधी भाजपवासी झालेल्या अशोक चव्हाण यांच्यामुळे संपुर्ण नांदेड जिल्हा काँग्रेसमुक्त करण्याची भाषा राज्यातील नेत्यांनी सुरू केली होती. पण लोकसभेत भाजप महायुतीचा पराभव करत महाविकास आघाडीनेच नांदेड जिल्हा भाजपमुक्त करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकल्याचे बोलले जाते.

Ashok Chavan-Shrijaya, Amita Chavan
BJP Leader Ashok Chavan : लोकसभेतील पराभवाने आधीच झोप उडाली, आता विधानसभेला पुनरावृत्तीची धास्ती..

लोकसभेतील पराभव विसरून अशोक चव्हाण जिल्ह्यात नव्या जोमाने कामाला लागले आहेत. मुलगी श्रीजया हिला भोकर विधानसभा मतदारसंघातून आमदार करण्याचे त्यांचे मिशन आहे. यासाठी चव्हाण कुटुंब मैदानात उतरले आहे. पण लोकसभा निवडणुकीत लागलेली मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) धग अजूनही कायम असल्याची प्रचिती श्रीजया चव्हाण, अमिता चव्हाण यांना नुकतीच आली. भोकर मतदारसंघातील अर्धापूर तालुक्यातील धामदरी गावात मराठा आंदोलकांनी श्रीजया, अमिता चव्हाण यांना रोखत मराठा आरक्षणावर जाब विचारला.

याआधी श्रीजया यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला तोंड द्यावे लागले होते. अशोक चव्हाण यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची दोन वेळा अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेत आपली आरक्षणाबाबतची भूमिका सांगितली. मात्र मराठा समाजातील तरुणांचे यातून समाधान झालेले नाही. लोकसभेला अशोक चव्हाण यांना जाब विचारणारे आंदोलक आता भोकरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर फिरत असलेल्या अमिता व श्रीजया चव्हाण या मायलेकींना जाब विचारायला सुरवात करत विरोध दर्शवला आहे.

Ashok Chavan-Shrijaya, Amita Chavan
Maratha Reservation News : गावभेटीसाठी गेलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला मराठा आंदोलकांनी अडवले

कधीकाळी नांदेड म्हणजे चव्हाण आणि चव्हाण म्हणजे नांदेड असे जिल्ह्यात समीकरण होते. पण काँग्रेसमध्ये राज्यात, केंद्रात मोठी पद भूषवल्यानंतरही अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या निर्णयाबद्दल नांदेडकरांनी लोकसभेत आपला रोष काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांना निवडून देत व्यक्त केला.

आता विधानसभेत याची पुनरावृत्ती होते की काय? यांची चिंता अशोक चव्हाण यांना सतावत आहे. विधानसभा निवडणूक जवळ येत असताना चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाला मराठा समाजाचा वाढता विरोध त्यांच्यासाठी धोक्याची घंटा म्हणावी लागेल. म्हणूनच `हवा बहोत तेज चल रहा है`..अशोकराव हे सांगण्याची वेळ आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com