The Chief Minister saved Sattar again : मुख्यमंत्र्यांकडून लाडक्या सत्तारांना पुन्हा अभय ; राजीनाम्याऐवजी कानपिचक्यांवर भागले...

Abdul Sattar : सत्तारांनी मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत चूक मान्य केल्याने त्यांना परत एकदा अभय देण्यात आले.
Minister Abdul Sattar-Eknath Shinde News
Minister Abdul Sattar-Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News : कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अंतर्गत कृषी विभागाच्या पथकाने तीन दिवसांपुर्वी अकोला येथील बोगस बियाणे विक्रेत्यांच्या दुकानावर धाडी टाकल्या. (The Chief Minister saved Sattar again) खंडणीसाठी खाजगी व्यक्तींचा या पथकात समावेश होता, पाच लाखांची खंडणी मागण्यात आली असा आरोप या प्रकरणात झाला. त्यामुळे ही धाड राज्यभर गाजली आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली.

Minister Abdul Sattar-Eknath Shinde News
Eknath Shinde News : 'त्या' पाच मंत्र्यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री शिंदेंचं मोठ विधान ; मला सगळी माहिती..

एकीकडे भाजपच्या हायकंमाडने अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यासह शिंदे सेनेच्या पाच मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव आणल्याची चर्चा सुरू असतांना सत्तारांच्या कृषी विभागाकडून धाड टाकल्याच्या प्रकरणाने विरोधकांच्या हाती कोलितच सापडले. (Shivsena) पण यापुर्वी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरले म्हणून, त्यानंतर सिल्लोड येथील कृषी महोत्सवासाठी वसुली केल्याच्या आरोपामुळे तर वाशिम जिल्ह्यात गायरान जमीनीचे बेकायदा वाटप केल्याप्रकरणी सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली गेली होती.

आता कृषी विभागाच्या धाड प्रकरणामुळे चौथ्यांदा सत्तार यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा मागितला गेला. पण या प्रत्येक वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि इच्छा नसतांना सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तारांचा बचाव केला. एवढेच नाही तर त्यांची पाठराखण करण्यासाठी त्यांच्या पाठीशी हे दोघेही उभे राहिले. पण अकोला येथील धाड प्रकरणात सत्तार पुरते अडकले, त्यामुळे त्यांचे मंत्रीपद यावेळी नक्की जाणार असे बोलले जात होते.

परंतु काल झालेल्या मंत्रीमंडळ आणि त्यानंतरच्या बंद दाराआडच्या बैठकीत शिंदे, फडणवीस या दोघांनीही सत्तार यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांना खडे बोल सुनावले. मुख्यमंत्र्यांनी तर तुमच्या मुळे सरकारची पत जात असल्याचे सांगत सत्तारांना चांगल्याच कानपिचक्या दिल्याची चर्चा आहे. पण ऐवढे होवून देखील सत्तारांच्या मंत्रीपदाला कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट झाले.

सत्तारांनी मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत चूक मान्य केल्याने त्यांना परत एकदा अभय देण्यात आले. विशेष म्हणजे हायकमांडचा दबाव झुगारत शिंदे यांनी एकाही मंत्र्याचा राजीनामा घेणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे भुमरे, राठोड, सावंत, पाटीलसह सत्तारांचाही जीव भांड्यात पडला. कायम वादग्रस्त राहिलेल्या अब्दुल सत्तारांना मुख्यमंत्र्यांकडून अभय मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनीही सुटकेचा निश्वास सोडला. सत्तार मुख्यमंत्र्यांचे लाडके आहेत, हे देखील या निमित्ताने पुन्हा सिद्ध झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com