काॅंग्रेसचा उमेदवार निश्चित, भाजपचे साबणेंच्या पक्ष प्रवेशानंतर ठरणार..

(Bjp Leader Devendra Fadanvis) फडणवीस भास्कर पाटील खतगावकर यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतरच माजी आमदार साबणे (Ex. Mla Subhash Sabane) यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर होईल.
Chandrakant Patil-Subhash Sabande
Chandrakant Patil-Subhash SabandeSarkarnama

देगलूरः देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कॉँग्रेस आणि भाजप या प्रमुख दोन पक्षांच्या उमेदवार निवडीच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवरून हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या मोठी असली तरी प्रदेश सरचिटणीस जितेश रावसाहेब अंतापूरकर यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.

गेल्या तीन महिन्यापूर्वीच पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सार्वजनिक कार्यक्रमातून अनेकदा तसा दुजोराही दिला होता. भाजपचे सध्या तळ्यात मळ्यात असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नांदेड भेटीनंतर माजी आमदार सुभाष साबणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे वृत्त आहे.

भाजपाकडून शिवसेनेचे मराठवाडा प्रतोद, विधानसभेचे तालिका सभापती राहिलेले व तीन वेळा आमदार राहिलेले व थेट बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक म्हणून गणना असणारे माजी आमदार सुभाष साबणे यांचे नाव घेतले जात आहे. असे असले तरी त्यांच्या नावावर अद्यापही शिक्कामोर्तब भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरून झाले नसल्याचे समजते. मात्र, त्या दृष्टीने गुरुवारी (ता. ३०) मुंबईत बऱ्याच खलबती झाल्या.

या बैठकीला खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी सुभाष साबणे यांच्या पक्ष प्रवेशासंदर्भात चर्चा केली गेली. मागच्या विधानसभेत सर्व प्रमुख राजकारण्यांनी कुटनीती करून साबणे यांच्या पराभव कसा केला याचा पाढाच एका कार्यकर्त्याने भाजप श्रेष्ठी समोर वाचल्याचे बोलले जाते. यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्ष प्रवेशाला सकारात्मक प्रतिसादही दिल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी प्रकृतीच्या कारणास्तव बैठकीला दांडी मारली. मात्र त्याचवेळी शंकरनगरमध्ये कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त आपल्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेऊन भाजप पक्षश्रेष्ठींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्नही केला. ही माहिती मुंबईतील भाजप नेत्यांपर्यंतही गेली.

खतगावकर एखाद्याला निवडून आणू शकले नसतील तर त्याला पराभूत करू शकतात. यावरही बरीच चर्चा झाली. येथे जिल्हा परिषद सदस्या डॉ. मीनल खतगावकर व खुद्द खतगावकर यांचे भाषण झाले. झालेल्या भाषणबाजीमुळे पक्ष पातळीवर बऱ्याच खलबती रात्री उशिरा मुंबईत घडल्याची माहिती आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी नांदेडात येत आहेत. नांदेडला शनिवारी रात्री उशिरा ते दाखल होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने ते शनिवारी (ता. दोन) नांदेडमध्ये येऊन थेट राजेंद्रनगरस्थित माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतरच माजी आमदार सुभाष साबणे यांच्या पक्ष प्रवेशाचा मार्ग सुकर होईल.

Chandrakant Patil-Subhash Sabande
`चिखल` बीडच्या `खड्ड्यात` कोणत्या क्षीरसागरांची गाडी स्लिप होणार?

अन्यथा खतगावकर गट वेगळा मार्ग निवडतील, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरु आहे. भाजपला सध्या हे परवडणारे नसल्याने ते खतगावकरांची मनधरणी करतील, असा कयास बांधला जात आहे. खतगावकरांचा आजही मतदारसंघात दबदबा असून प्रत्येक खेडेगावात त्यांचा कार्यकर्ता असल्याने पक्षालाही त्यांना सोडून वेगळा निर्णय घेता येणार नसल्याने भाजपाच्या उमेदवारी निवडीला विलंब होत असल्याचे बोलले जाते. विरोधी पक्षाच्या दौऱ्यानंतर सोमवारी प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत भाजपा आपला उमेदवार जाहीर करणार आहे.

दरम्यान, देगलूर येथील गोविंद माधव मंगल कार्यालयामध्ये भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा मेळावा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी आयोजित केला आहे. यावेळी माजी आमदार सुभाष साबणे यांच्या पक्ष प्रवेशासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता असून सोमवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देगलूर दौऱ्यावर येत असल्याने त्या अनुषंगाने ही या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com