Bhumre said about ministership : ज्या खात्याला कोणी ओळखत नव्हतं ते नावारुपाला आणलं, मग कसली नाराजी ?

Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील माझ्या खात्याच्या कामाचे कौतुक केले आहे.
Guardian Minister Sandipan Bhumre News
Guardian Minister Sandipan Bhumre NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे असलेल्या रोजगार हमी, फलोत्पादन मंत्रालयाच्या कामाचे कौतुक केले आहे. (Bhumre said about ministership) ज्या खात्याला कोणी ओळखत नव्हतं, ते मी नावारुपाला आणलं, मग कसली नाराजी ? असा सवाल करत रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी त्यांच्यासह शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांना मंत्रीमंडळातून काढण्याची चर्चा निरर्थक असल्याचा दावा केला.

Guardian Minister Sandipan Bhumre News
Beed March News : पवार-राऊत यांना मिळालेल्या धमकीच्या विरोधात पहिला मोर्चा बीडमध्ये..

राज्यातील मंत्रीमंडळ विस्तारा संदर्भात गेल्या आठवड्यात दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Saha) यांच्यासोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली होती. त्यानंतर महाराष्ट्रात शिंदे गटातील पाच मंत्र्यांची हकालपट्टी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

या पाच मंत्र्यांमध्ये रोहयो मंत्री संदीपान भुमरे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, (Abdul Sattar) आरोग्य मंत्री तानाजी सावंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा समावेश असल्याचे बोलले जाते. (Shivsena) यावर संदीपान भुमरे यांना विचारले असता या सगल्या विरोधकांच्या अफवा असल्याचे म्हटले.

रोजगार हमी योजना खाते यापुर्वी लोकांना माहित नव्हते, मी या खात्याचा मंत्री झालो तेव्हापासून यात अनेक बदल केले. शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा कसा मिळेल? याचा विचार करत धोरणं आखली. मी मंत्री झाल्यापासूनच हे खातं लोकांना माहित झालं, ते नावारुपाला आलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील माझ्या खात्याच्या कामाचे कौतुक केले आहे. मग कसली नाराजी? या सगळ्या चर्चा खोट्या आहेत. पाच मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी शिंदेसाहेबांवर हायकमांडचा दबाव या विरोधकांनी पेरलेल्या अफवा असल्याचेही भुमरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com