Abdul Sattar : माझ्याऐवजी खोतकर मंत्री झाले तरी चालतील, अब्दुल सत्तारांनी मन केलं मोठ..

The magnanimity of Abdul Sattar's mind : जालन्यातील एका कार्यक्रमात सत्तार-खोतकर एकत्र आले होते. यावेळी अब्दुल सत्तार यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये अर्जून खोतकर यांच्या विजयासाठी मदत करणार असल्याचे जाहीरपणे सांगितले. माझे बुलडाण्याचे मित्र खासदार प्रताप जाधव केंद्रात मंत्री झाले, याचा मला आनंद झाला.
Abdul Sattar, Arjun Khotkar, Raosaheb danve
Abdul Sattar, Arjun Khotkar, Raosaheb danve Srakarnama
Published on
Updated on

Shivsena Political News : लोकसभेच्या जालना मतदारसंघात रावसाहेब दानवे यांच्या पराभवात मंत्री अब्दुल सत्तार आणि माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी हातभार लावला हे आता लपून राहिलेले नाही. राज्यात महायुती असताना या दोन नेत्यांनी दानवे यांना हात दाखवत चकवा दिला. रावसाहेब दानवे यांची परतफेड सिल्लोड-सोयगाव आणि जालना विधानसभा मतदारसंघात करतील याची पक्की खात्री असल्यामुळे अब्दुल सत्तार आणि अर्जून खोतकर ही जोडी पुन्हा एकत्र आली आहे.

खोतकर सिल्लोडमध्ये तर सत्तार जालन्यात अर्जून खोतकर यांच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहेत. सत्ता, मंत्रीपदासाठी पक्षाला व नेतृत्वाला जेरीस आणणाऱ्या अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी मित्र अर्जून खोतकर यांच्यासाठी मात्र मनाचा मोठेपणा दाखवला आहे. जालना विधानसभा मतदारसंघात त्यांना शक्य ती मदत मी करायला तयार आहे. ते माझे छोटे भाऊ आहेत, ते पुढे गेले तर मला आनंदच होईल. उद्या माझ्याऐवजी ते मंत्री झाले तरी माझी हरकत नसले, असे सांगत सत्तार यांनी खोतकराना सर्वोत्तपरी मदतीची तयारी दर्शवली.

जालन्यातील एका कार्यक्रमात सत्तार-खोतकर एकत्र आले होते. यावेळी अब्दुल सत्तार यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये अर्जून खोतकर यांच्या विजयासाठी मदत करणार असल्याचे जाहीरपणे सांगितले. माझे बुलडाण्याचे मित्र खासदार प्रताप जाधव केंद्रात मंत्री झाले, याचा मला आनंद झाला. एक टायगर तिथे मंत्री आहे, आता माझा दुसरा मित्र अर्जून खोतकर हा वाघ विधानसभेत दिसला पाहिजे. माझ्याऐवजी त्यांना मंत्री केले तरी चालेल, असे म्हणत सत्तारांनी खोतकरांवरचे आपले प्रेम व्यक्त केले.

Abdul Sattar, Arjun Khotkar, Raosaheb danve
Minister Abdul Sattar : सत्तार है, तो मुमकीन है ; गर्दी जमवत मुख्यमंत्र्यांना दाखवली ताकद..

जालना जिल्ह्याच्या राजकारणात रावसाहेब दानवे यांच्या विरोधात 2019 मध्ये सत्तार-खोतकर जोडी मैदानात उतरली होती. (Shivsena) तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या अब्दुल सत्तारांनी खोतकरांसाठी काँग्रेसची उमेदवारी मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. पण शिवसेना-भाजप युती असल्याने उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून अर्जून खोतकर यांनी माघार घेतली होती. या बदल्यात रावसाहेब दानवे यांनी खोतकरांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली.

पण अर्जून खोतकरांचा विधानसभेला पराभव झाला आणि ते पाच वर्ष बाजूला फेकले गेले. दरम्यान त्यांच्या मागे ईडीची पिडा लागली, त्यासाठी खोतकरांनी रावसाहेब दानवे यांनाच जबाबदार धरले होते. आता रावसाहेब दानवे लोकसभेला पराभूत झाल्यानंतर जालन्यात अर्जून खोतकर पुन्हा सक्रीय होऊन वर्चस्व मिळवू पाहत आहेत. यासाठी मंत्री अब्दुल सत्तार त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. आता ही जोडी विधानसभेला काय चमत्कार जालना जिल्ह्यात करते? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com