बीड : जिल्ह्याचा साताऱ्याशी जुना संबंध आहे, क्रांतीसिंह नाना पाटील येथून खासदार होते. मीही (Beed) बीडला जिल्हाधिकारी होतो. आज शिवाजीराव पंडित यांच्या अभिष्टचिंतनासाठी थ्री एस. (शरद पवार, शिवाजीराव पंडित व श्रीनिवास पाटील) Shrinivas Patil एकत्र आलेले आहेत. आता आम्हाला अमर करा. शिवाजीराव पंडित व मी आम्हा दोघांचीही टोपी तिरपी अन् मिशा पिळदार आहेत. त्याचाच आनंद घेण्यासाठी आल्याचे माजी राज्यपाल व सातारचे खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले.
जेष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांच्या ८५ व्या अभिष्टचिंन सोहळ्यात (Ncp) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीनिवास पाटील यांनी जिल्हाधिकारी म्हणून बीड जिल्ह्यात केलेल्या कामांची आणि त्यांच्या व शिवाजीराव पंडित यांच्या स्नेहाला उजाळा दिला.
आज शरद पौर्णिमा असून दूध बारामतीचे व साखर जयभवानीची असल्याने गोडवा अधिक असल्याचेही श्रीनिवास पाटील म्हणाले. बीड जिल्ह्यात कलेक्टर म्हणून काम केल्याने तिकडे जाऊन राज्यपाल व खासदार झालो, अशी आठवण देखील पाटील यांनी यावेळी सांगितली.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी देखील पंडित यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा उल्लेख केला. पवार म्हणाले, शिवाजीराव पंडित यांनी या भागात जायकवाडीचे पाणी आणण्याबरोबरच जयभवानी सहकारी साखर कारखान्याची उभारणी करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही दिलासा दिला.
शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांनी या भागात शाळा - महाविद्यालयांचे जाळे उभारुन सामान्यांना शिक्षणाची सोय करुन दिली. पद गेल्यानंतर सर्वस्व गेल्यासारखे अनेक लोक दिसतात. मात्र, शिवाजीराव पंडित यांनी स्वत: राजकारणातून निवृत्ती घेत उत्तम शेती करुन नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे. शिवाजीराव पंडित यांनी तुमच्यासाठी ५० वर्षे काम केले असून पुढच्या पिढीला पाठबळ द्या, असे आवाहनही पवार यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.