Archana Patil News : ...म्हणून धाराशिवमध्ये अर्चना पाटलांना उमेदवारी, बाजी मारणार?

Ncp News : भाजपसोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागला. ही सर्व तारेवरची कसरत करीत असताना महायुतीकडून सर्व बाबींची व उमेदवारीसाठी घातलेल्या निकषांची चाचपणी करूनच त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचे समजते.
Archana Patil
Archana Patil Sarakarnama

Dharashiv Lok Sabha News : धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी अर्चना पाटील यांना महायुतीची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना भाजपसोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागला. ही सर्व तारेवरची कसरत करीत असताना महायुतीकडून सर्व बाबींची व उमेदवारीसाठी घातलेल्या निकषांची चाचपणी करूनच त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचे समजते.

धाराशिव मतदारसंघात विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना तोडीसतोड देणारा उमेदवार कोण ठरू शकतो यासाठी भाजपकडून सर्वे करण्यात आला होता. त्यासोबतच संघाचा सर्वे, केंद्रीय यंत्रणांकडून चाचपणी करण्यात आली होती. त्यानंतर अर्चना पाटील (Archana Patil) या राष्ट्रवादीच्या (Ncp) चिन्हावर लढणार असल्याची माहिती दिल्ली दरबारी देण्यात आली. त्यानंतर या उमेदवारीसाठी दिल्लीत खलबतं झाली. त्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून अर्चना पाटील यांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर ही उमेदवारी घोषित करण्यात आली. (Archana Patil News)

Archana Patil
Baramati Loksabha constituancy : शरद पवारांचा बारामतीत धमाका; फडणवीसांना ‘इट का जवाब पत्थर से’

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक संमत झाले आहे. त्यामुळे २०२९ पासून महिलांना लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी आरक्षणामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाणार आहे. त्यामुळेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून मराठवाड्यात बीडमधून पंकजा मुंडे तर धाराशिवमधून अर्चना पाटील या दोन महिला उमेदवाराना रिंगणात उतरविण्यात आले आहे. या निवडणुकीकडे मराठवाड्यातील लिटमस टेस्ट म्हणून पहिले जात आहे.

माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील राजकारणात सक्रीय असताना त्यांना भेटायला येणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांशी अर्चना पाटील यांचा चांगला संपर्क असायचा. प्रत्येक कार्यकर्त्याची त्या मायेने चौकशी व विचारपूस करत होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवारात त्यांची मोठी क्रेज आहे. त्याचा फायदा येत्या काळात लोकसभा निवडणुकीत त्यांना होणार आहे.

अर्चना पाटील या धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष असताना त्यांनी विविध कामातून अनेक नाविण्यपूर्ण गोष्टी करुन दाखवल्या आहेत. त्यांनी शाळकरी मुलांना सरसकट गणवेश देण्यासारखा अभिनव उपक्रम असेल किंवा आरोग्य केंद्रांची सुधारणा, या सारख्या उपक्रमांचा समावेश त्यामध्ये होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धाराशिव जिल्ह्यात त्यांनी महिलांचं मोठं नेटवर्क तयार केले आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये मोदी किंवा भाजपला मिळालेल्या यशामध्ये महिला मतदारांचा मोठा वाटा असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत असतात त्याचा फायदा धाराशिव मतदारसंघात महिला उमेदवार म्हणून त्यांना होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यासारख्या भागात या सायलेंट वोटरला अर्चना पाटील यांच्या निमित्ताने भाजप जवळ करु पाहत आहे. २००६ पासून म्हणजे गेल्या १८ वर्षांपासून त्यांचा विविध सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग असल्याचा फायदा त्यांना येत्या काळात होणार आहे.

Archana Patil
Dharashiv Lok Sabha Constituency : जनसंघ, भाजपच्या संस्थापकांची नात लढवणार धाराशिवचा किल्ला; दीर-भावजयमध्ये चुरस

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com