Baramati Loksabha constituancy : शरद पवारांचा बारामतीत धमाका; फडणवीसांना ‘इट का जवाब पत्थर से’

Supriya Sule बारामतीत खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी प्रतिष्टेची लढत होत आहे. यामाध्यमातून खासदार शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार अशीच लढत मानली जात आहे.
Sharad Pawar, Namdev Takawane, Devendra Fadanvis
Sharad Pawar, Namdev Takawane, Devendra Fadanvissarkarnama

Baramati Loksabha News : पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे दोनवेळेस जिल्हाध्यक्ष राहिलेले नामदेव ताकवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे दौंडमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना मोठे बळ मिळणार आहे. शरद पवार यांनी या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना ‘इट का जवाब पत्थर से’ दिला आहे.

बारामतीत खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी प्रतिष्टेची लढत होत आहे. यामाध्यमातून खासदार शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार अशीच लढत मानली जात आहे. दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे खासदार शरद पवार बारामतीत ठाम मांडून होते.

मध्यंतरी इंदापूरच्या दौऱ्यावर आलेले देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेण्यापूर्वी शरद पवारांचे निकटवर्तीय सोनाई डेअरीचे चेअरमन प्रवीण माने यांची भेट घेतली होती. त्यानंतरच प्रवीण माने यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. प्रवीण माने हे इंदापूरात सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत होते. मात्र, त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आहे.

Sharad Pawar, Namdev Takawane, Devendra Fadanvis
Supriya Sule vs Ajit Pawar : बारामतीमधील कामांबाबत अजित पवारांच्या दाव्यावर, सुप्रिया सुळेंचं हसून प्रत्युत्तर, म्हणाल्या...

यामुळे शरद पवार Sharad Pawar यांनी बारामती दौऱ्यात पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यांनी श्री. पवार यांची भेट घेतली आहे. नामदेव ताकवणे हे जनसंघाचे दौंडचे माजी आमदार राजाराम ताकवणे यांचे सुपुत्र आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ताकवणे यांच्या तीन पिढ्या या भाजप व आरएसएससोबत राहिलेल्या आहेत. भीमा पाटस सहकार साखर कारखान्याचा ५०० कोटींचा भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढला होता. दौंडमध्ये ताकवणे यांच्या मुळे सुप्रिया सुळे यांना मोठे बळ मिळणार आहे. यामाध्यमातून खासदार शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना 'इट का जवाब पत्थर से' दिला आहे.

Edited By : Umesh Bambare

Sharad Pawar, Namdev Takawane, Devendra Fadanvis
Sharad Pawar: पवार आडनावापुढेच मतदान करा? अजितदादांना शरद पवारांचे थेट उत्तर; मुलगी ही वंशाचाच नव्हे तर..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com