Maratha Reservation : बीड जिल्ह्यात आंदोलनाची धग कायम ; डोंगरकिन्हीत अन्नत्यागाचा तिसरा दिवस

Maratha Andolan : डोंगरकिन्ही (ता. पाटोदा) येथील अन्नत्याग आंदोलनाचा सोमवारी (ता. ४) तिसरा दिवस होता.
Beed News
Beed News Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी अंतरवली सराटे येथे सुरु केलेल्या उपोषणास पाठींबा आणि पोलिसांच्या लाठीहल्ल्याच्या निषेधाची धग जिल्ह्यात कायम आहे. अन्नत्याग, ठिय्या आंदोलने सुरूच आहे. डोंगरकिन्ही (ता. पाटोदा) येथील अन्नत्याग आंदोलनाचा सोमवारी (ता. ४) तिसरा दिवस होता.

मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटे येथे मराठा (Maratha Reservation) आरक्षण मागणीसाठी अमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आलेल्या समाजबांधवांवर लाठीहल्ला झाल्यानंतर याचे सर्वाधिक पडसाद बीड जिल्ह्यात उमटले. डोंगरकिन्हीत शनिवार पासून अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

Beed News
Phaltan Maratha Protest : तोपर्यंत मतदान करणार नाही : फलटण मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

आंदोलनकर्ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. आरक्षण मिळेपर्यंत अन्नत्याग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. र्त्यांना समाजातील सर्व घटकांकडून सहानुभूती व पाठींबा मिळत आहे. आतापर्यंत आंदोलनास विविध पक्षांचे बडे नेते, पदाधिकारी सहभागी होऊन पाठींबा देत आहेत.

Beed News
Maratha Reservation : भाजपला मराठा समाजाला आरक्षणच द्यायचे नाही; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

नजीकच्या शिरुर (कासार) व आष्टी तालुक्यातुनही आंदोलकांना भेटण्यासाठी फेऱ्या काढून समाज बांधव येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत डोंगरकिन्ही मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरले आहे. दरम्यान, पिट्टी नायगाव व परळीत देखील सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com