औरंगाबादच्या नामांतरावर चर्चा झाली नाही, प्रस्ताव मंजुर झाल्यानंतर आम्हाला समजले..

मंत्रिमंडळाच्या बैठकीत एखादा निर्णय झाला तर त्यावर नंतर बोलणे योग्य नाही. परंतु या नाव बदलण्याच्या निर्णयापेक्षा लोकांच्या मुलभूत प्रश्नांकडे अधिक लक्ष दिले असेत तर चांगले झाले असते. (Sharad Pawar)
Ncp Chief Sharad Pawar News
Ncp Chief Sharad Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून औरंगाबाद, उस्मानाबाद शहराचे नाव बदलण्याचा निर्णय हा शेवटच्या क्षणी घेतला होता. (Aurangabad) याबाबत आमच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही, किंवा हा विषय आमच्या सरकारच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग देखील नव्हता. मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजुर झाल्यानंतरच आम्हाला समजले, असे सांगत नामांतराच्या निर्णयाशी आमचा संबंध नसल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलतांना शरद पवार यांनी या संदर्भात भाष्य केले. औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर करण्याचा निर्णय महाविकास आघाडीचे सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतला होता. (Marathwada) या निर्णयाला काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केला नाही असा आरोप करत या दोन्ही पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत नाराजी व्यक्त केली होती.

काॅंग्रेस नेतृत्वाने तर विधीमंडळातील त्यावेळचे नेते व मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे खुलासाच मागितला होता. यावर राष्ट्रवादीची भूमिका काय होती, असे विचारले असता शरद पवार म्हणाले,नामांतरावर चर्चा झाली नाही. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यात आले, मात्र हा महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता. मंत्रीमंडळ बैठकीत अगदी शेवटच्या क्षणी हा निर्णय घेतला गेला.

प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतरच आम्हाला समजले. परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीत एखादा निर्णय झाला तर त्यावर नंतर बोलणे योग्य नाही. परंतु या नाव बदलण्याच्या निर्णयापेक्षा लोकांच्या मुलभूत प्रश्नांकडे अधिक लक्ष दिले असेत तर चांगले झाले असते असा टोला देखील पवारांनी लगावला. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर भाजपकडून आता असाच प्रयोग गोव्यात करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

Ncp Chief Sharad Pawar News
राऊतांना राज्यसभेच्यावेळी मतदान केले तेव्हा त्यांनी किती पैसे दिले, शपथ घेऊन सांगावे..

याकडे लक्ष वेधले असता शरद पवार म्हणाले, भाजपकडून लोकशाहीच्या संस्था उद्धस्त करण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्राच्या जवळ असलेल्या राज्यांमध्ये अशाप्रकारचे प्रयत्न होतांना दिसतात. कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्रानंतर आता गोव्यात हा प्रयोग राबवला जात आहे. सत्ता गेली म्हणून अस्वस्थ झालेले आता कमी अस्वस्थ झाले असतील असा टोलाही त्यांनी फडणवीस यांना लगावला.

सरकार पाडण्याचे काही ठोस कारण नव्हते हिंदुत्व, राष्ट्रवादीला दोष देत तर कुणी ईडीच्या कारवाईमुळे बाहेर पडल्याचे सागंत होते. पण ही सगळी चर्चा बंडखोर आमदार सुरतला गेल्यानंतर समोर आली. यापुर्वी हे विषय कधी कानावार आले नव्हते, असा चिमटा देखील त्यांनी शिंदे व त्यांच्यासोबत बाहेर पडलेल्या आमदारांना काढला. तसेच या सगळ्यांनी जनतेसमोर येऊन बंडाचे कारण स्पष्ट करावे, असेही पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com