औरंगाबादेत मुख्यमंत्र्यांच्या सभेला परवानगी...पण ध्वनीक्षेपकाचा आवाज मर्यादेतच हवा!

मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादेत ८ जून १९८५ रोजी स्थापन झाली होती. या शाखेच्या ३७ वा वर्धापनदिन असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. (Shivsena)
Cm Uddhav Thackeray
Cm Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ८ जून रोजी होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानूसारच सभास्थळी ध्वनीक्षेपकाचा आवाज असावा, यासह पंधरा अटी सभेसाठी घालण्यात आल्या आहेत. (Aurangabad) १ मे महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर झालेली जाहीर सभा आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाणी प्रश्नावर काढलेल्या जल आक्रोश मोर्चाला उत्तर म्हणून या सभेकडे पाहिले जात आहे.

शिवसेनेचे (Shivsena) मराठवाडाआणि राज्य पातळीवरील नेते देखील औरंगाबादेतील सभा यशस्वी करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून कष्ट घेत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या बहुतांश अटीचे उल्लंघन करण्यात आले होते. (Uddhav Thackeray) त्यामुळे या प्रकरणात राज ठाकरे यांच्या विरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर फडणवीस यांच्या मोर्चाला देखील यांनी कडक अटी-शर्तींच्या आधारेच परवानगी दिली होती.

आता तोच नियम मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी देखील पोलिसांनी लावल्याचे दिसत आहे. मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादेत ८ जून १९८५ रोजी स्थापन झाली होती. या शाखेच्या ३७ वा वर्धापनदिन असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार आहे. या सभेसाठी औरंगाबाद शहर पोलिसांनी आज परवानगी दिली. पंधरा अटी-शर्ती या सभेसाठी घालण्यात आल्या आहेत.

Cm Uddhav Thackeray
चाळीस वर्षे शरद पवारांनी सांभाळलं, पण सत्तेसाठी त्यांचीच साथ सोडली..

यात प्रामुख्याने जाहीर सभा ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या ठिकाणी घ्यावी, सभेच्या वेळी कुठलाच रस्ता वाहतुकीस बंद करू नये, सभेला येतांना किंवा जातांना घोषणाबाजी, हुल्लडबाजी होणार नाही याची दक्षता घ्यावी, मोटारसायकल, कार रॅली काढू नये, मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रीत करु नये, ढकला ढकली, गोधळ, चेंगराचेंगरी झाल्यास याची जबादारी संयोजकांवर राहील.

सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकर संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देश व ध्वनिप्रदुषण नियमाचे पालन करावे असावी. तसेच कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचणार नाही याची काळजी संयोजकांनी घ्यावी, असे पोलिसांकडून बजावण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com