Shivajirao Patil Nilangekar News: साडे दहा फूट उंच, एक टन वजनाच्या डाॅ.निलंगेकरांच्या पुतळ्याचे उद्या अनावरण..

Nilangekar : महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मंडळात अनेक मंत्री पदे उपभोगलेले डॉ. निलंगेकर यांचा राज्यातील काँग्रेस पक्षात मोठा दबदबा होता.
Let.Ex.Cm Shivajirao Nilangekar News, Latur
Let.Ex.Cm Shivajirao Nilangekar News, LaturSarkarnama
Published on
Updated on

Latur News : राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.शिवाजीराव पाटील निलंगेकर (Shivajirao Patil Nilangekar) यांच्या साडेदहा फुट उंच, एक टन वजनाच्या ब्राॅंझपासून तयार केलेल्या पुतळ्याचे अनावरण उद्या (ता.९) रोजी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. हा पूर्णाकृती पुतळा पुण्याचे प्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे यांनी तयार केला असून त्यासाठी एक वर्ष कालवधी लागला.

Let.Ex.Cm Shivajirao Nilangekar News, Latur
MNS : ‘शिल्लकांनी’ नको तिथे बोटं खुपसू नयेत..; ठाकरेंचं सासर अन् आजोळ मनसेच्या रडारवर

कै. डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या या पुतळ्याचे अनावरण ९ फेब्रुवारी रोजी म्हणजेच त्यांच्या जयंतीदिनी निलंगा शहरातील महाराष्ट्र महाविद्यालच्या प्रांगणावर होणार आहे. (Latur) महाराष्ट्राच्या राजकारणात आणि लातूर जिल्ह्यासाठी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे असलेले योगदान, स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.(Marathwada)

कै. डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या या पुतळ्याचे अनावरण ९ फेब्रुवारी रोजी म्हणजेच त्यांच्या जयंतीदिनी निलंगा शहरातील महाराष्ट्र महाविद्यालच्या प्रांगणावर होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि लातूर जिल्ह्यासाठी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे असलेले योगदान, स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. निलंगेकर यांचा पूर्णाकृती पुतळा पूणे येथील वडगाव बु. येथे तयार झाला असून हा पूर्णाकृती पुतळा ब्रांझ धातूचा आहे.

औरंगाबाद येथील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वाधिक उंच व मोठा पुतळा बनवणारे दीपक थोपटे यांनी एक वर्षापासून मेहनत घेऊन तो बनवला आहे. एक हजार किलो म्हणजे एक टन वजनाचा हा पुतळा असून यावर वारा, ऊन, पाऊस यांचा कोणताही परिणाम होणार नाही. पुतळ्याची उंची साडेदहा फुट असून तिन्ही ऋतूमध्ये पुतळ्याची झळाळी अधिक प्रमाणात खुलणार आहे.

काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून डाॅ.निलंगेकर यांना गांधी परिवारामध्ये मोठा मान होता. माजी पंतप्रधान कै. इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचे अतिशय विश्वासाचे व जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी मराठवाड्यातील औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ याच संबंधातून आणले. शिवाय लातूर व जालना जिल्ह्याची निर्मितीसुध्दा केली होती. अनेकवेळा महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मंडळात अनेक मंत्री पदे उपभोगलेले डॉ. निलंगेकर यांचा राज्यातील काँग्रेस पक्षात मोठा दबदबा होता. त्यांच्या शब्दाला वजन होते.

Let.Ex.Cm Shivajirao Nilangekar News, Latur
Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या सभेत गोंधळ : डिजे बंद केल्यामुळे दोन गटात राडा!

पाटबंधारे मंत्री असतांना त्यानी मराठवाड्यात तेरणा व मांजरा नदीपात्रावर अनेक धरणे बांधून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न केला. कोयना, लोअर तेरणा, उजनी, सिंधफना, कुकडी, कृष्णा, मांजरा, अप्पर वर्धा, कालीसार बॅरेज, धनेगाव, मदनसुरी, औरादशहाजानी, येथे कोल्हापूरी पध्दतीचे बंधारे बांधून शेतकऱ्यांना जल सिंचनाची अधिक सोय उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्यांना सिंचनाचे जनक अशी पदवी शेतकऱ्यांनी बहाल केली होती. निलंगा मतदार संघातील अनेक गावात शैक्षणिक संस्था उभ्या करून त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय करून दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com