MNS : ‘शिल्लकांनी’ नको तिथे बोटं खुपसू नयेत..; ठाकरेंचं सासर अन् आजोळ मनसेच्या रडारवर

MLA raju patil : बाळासाहेबांच्या विचारांसोबत जो नडला त्याला फोडला ही हिंमतही आमच्यात आहे,
aditya thackeray, raju patil
aditya thackeray, raju patil sarkarnama

MLA raju patil tweet on aditya thackeray News : ठाकरे गटाचे नेते, माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली या सभेच्या माध्यमातून शिंदेंनी आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात जाऊन त्यांना थेट आव्हान दिले आहे. अशातच आदित्य ठाकरेंना डिचवण्यासाठी मनसे मैदानात उतरली आहे.

डोबिंवली हे आदित्य ठाकरे यांचे आजोळ आहे. डोंबिवलीतील विविध समस्यांवर मनसेनं त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मनसेचं राज्यातील एकमेव आमदार राजू पाटील यांनी टि्वट करीत आदित्य ठाकरेंना आव्हान केलं आहे.

“२५ वर्ष आपलीच सत्ता असणाऱ्या आजोळची (डोंबिवली) दुर्दशा कधी पाहिली? कुठलंही काम न करता % वारी व करून दाखवलं बाता, हाच ‘गोठलेल्यांचा’ स्वभाव. त्यामुळे ‘शिल्लकांनी’ नको तिथे बोटं खुपसू नयेत. नाहीतर बाळासाहेबांच्या विचारांसोबत जो नडला त्याला फोडला ही हिंमतही आमच्यात आहे," असे टि्वट राजू पाटील यांनी केलं आहे.

aditya thackeray, raju patil
Pune News : तलाठ्यासाठी मदतनीसाने मागितली ३५ हजाराची लाच, तलाठी गोत्यात..

कल्याण-डोंबिवली महापालिकेवर गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. राजू पाटील हे कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्या हद्दीत कल्याण डोंबिवली महापालिका येते. येथे अनेक वर्षांपासून येथे रस्त्यांसह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांबाबत राजू पाटील सातत्याने आवाज उठवत आहेत.त्यांच्या निशाण्यावर आदित्य ठाकरे आणि पर्यायाने शिवसेना आहे.

काही दिवसापूर्वी आदित्य ठाकरे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना मनसेला डिवचलं होते. 'संपलेला पक्ष' असा उल्लेख आदित्य ठाकरे यांनी केला होता, तेव्हापासून मनसेच्या नेत्याच्या रडारवर आदित्य ठाकरे आहेत. सहा महिन्यापूर्वी शिवसेनेत फूट पडल्यामुळे मनसेनं शिवसेनेच्या उल्लेख "शिल्लकसेना' असा केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com