गुरू-शिष्य भेट : चौथीत शिकवणारे शिक्षक दानवेंना पाहून म्हणाले, माझे शिकवणे सार्थकी लागले..

लहानपणी ज्यांनी शिक्षणाचे धडे दिले, त्या गुरूजींची इतक्या वर्षानंतर झालेली भेट सुखावणारी होती. (Central Minister Raosaheb Danve)
Minister Raosaheb Danve Meet His Teacher News
Minister Raosaheb Danve Meet His Teacher NewsSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना चौथी-पाचवीत असतांना शिकवणारे शिक्षक अचानक भेटले. (Jalgaon) जळगांव जिल्ह्यातील जामनेर दौऱ्यावर असतांना नाचनखेड गावात हि गुरु-शिष्याची भेट झाली.

आपला विद्यार्थी देशाच्या राजकारणात एवढ्या मोठ्या पदावर पोहचल्याचे पाहून शिक्षकाचे ऊर आनंदाने भरून आले. (Raosaheb Danve) माझे शिकवणे सार्थकी लागले, अशा शब्दात त्यांनी आपल्या शिष्याच्या पाठीवर कौतूकाची थाप दिली. (Bjp)

रावसाहबे दानवे यांनीच हा गुरु-शिष्याच्या भेटीचा प्रसंग फेसबुकच्या माध्यमातून समोर आणला. रावसाहेब दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये शिक्षकांच्या भेटीचा उल्लेख केला आहे. दानवे म्हणतात, आज जामनेर दौऱ्यावर असतांना नाचनखेड येथे माझे शालेय शिक्षक युसूफ रेहमान पटेल यांची भेट घेतली. त्यांना मला पाहून मोठा आनंद झाला.

या निमित्ताने आमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. हे शिक्षक माझ्या लहानपणी जवखेडा येथिल जिल्हा परिषदेच्या शाळेत मला ४ थी व ५ वी ला शिकवायला होते. आज त्यांनी माझ्याजवळ "मी तुला शिकवले त्याचा मला अभिमान वाटतो.. माझी शिकवण सार्थकी लागली`, अशा भावना व्यक्त केल्या, मला देखील भरून आले.

Minister Raosaheb Danve Meet His Teacher News
Beed : काय हायवे, काय हाॅटेल, सगळं कसं ओक्के ; राष्ट्रीय महामार्गांच्या कामावर पंकजा मुंडे खूष..

लहानपणी ज्यांनी शिक्षणाचे धडे दिले, त्या गुरूजींची इतक्या वर्षानंतर झालेली भेट सुखावणारी होती. आपला विद्यार्थी राजकारणात मोठ्या पदावर पोहचला याचा सार्थ अभिमान आणि आनंद युसूफ पटेल सरांच्या चेहऱ्यावर दिसत होता, असेही दानवे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com