खूप गर्दी आहे, बाबा रागावतील: Aditya Thackeray

मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत.
Aditya Thackeray News
Aditya Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : गर्दी खूप आहे, पण ही गर्दी बघून मुख्यमंत्री मला रागावतील. मी सर्व नियम अंमलात आणतो. त्यामुळे मला मुख्यमंत्री बोलले तर मी सरळ शिवेसेनेचे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर ढकलून देईन", अशी मिश्किल प्रतिक्रिया राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. (Aditya Thackeray News)

मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) गुरुवारी (२७ जानेवारी) औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. ते सिल्लोड (Sillod) तालुक्यात आले असताना मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. पण यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या (social distancing) नियमांचे पूर्णपणे उल्लंघन करुन मोठ्या थाटामाटात त्यांचं स्वागत करण्यात आले. पण जमलेल्या गर्दीबाबत आदित्य ठाकरेंनीही कबूली दिली.

Aditya Thackeray News
काय सांगता! TET परीक्षेत अपात्र 7800 परीक्षार्थीं पैसे घेऊन पास

"मी खूप दिवसांनी बाहेर पडलो. लोकांना भेटून आनंद झाला. अनेकजण भेटण्यासाठी उत्सुक होते. मलाही बरं वाटलं. कारण कोरोना संकटानंतर दीड वर्षांनी अशी गर्दी बघत आहे. पण ही गर्दी बघितल्यानंतर बाबा रागावतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना नियमांच्या बाबतीत खूप काटेकोर आहेत. हे नियम पाळायाच पाहिजेत, अशी त्यांची भूमिका असते. त्यामुळे गर्दी टाळावी, असा त्यांचा उद्देश असतो. ते सत्यही आहे. कारण जिथे कोरोना वाढतोय तिथे गर्दी टाळली पाहिजे.''असं यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

तसचं, कार्यकर्ते आणि लोकांना भेटून मलाही आनंद झाला. मी जेव्हा फिरत असतो तेव्हा काळजीही घेतो. पण आज चौकात झालेल्या जंगी स्वागताचे कारण अब्दुल सत्तार हेच आहेत," अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी यावेळी केली. औरंगाबादमधील विकासकामांवरही त्यांनी भाष्य केलं.'

दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरेंनी वेरुळ-अजिंठा लेण्यांची पाहणीही केली. अजिंठा आणि वेरुळ लेण्यांवर काही विकासाच्या कामांची गरज आहे. त्याबद्दल आपण लगेच निर्णय घेऊ. तसेच औरंगाबाद जिल्ह्याला अजून चांगला विकास कसा करता येईल, तो जगासमोर अधिक चांगल्याप्रकारे कसा आणता येईल, त्यासाठी प्रयत्न मी कायम प्रयत्नशील असेल. असं आदित्य ठाकरे म्हणाले.

तर नितेश राणे प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलं. "नितेश राणेंबद्दल काय बोलायचं? पण आम्ही आमच्या राजकारणाची पातळी खालावून देणार नाही. आम्ही आमचं काम करत राहू आणि जनतेची सेवा करु", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com