Parbhani politics : मुरकुटेंच्या माध्यमातून भाजप गुट्टेंची 'शिकार' करणार ? जानकरांची भूमिका ठरणार महत्त्वाची

Gangakhed News : गंगाखेड मतदारसंघाची राज्यभरात 'लक्ष्मी अस्त्र'मुळे चर्चा असते.
Santosh Murkute, Ratnakar Gutte News
Santosh Murkute, Ratnakar Gutte NewsSarkarnama
Published on
Updated on

मारोती नाईकवाडे

Parbhani News : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्या अनुषंगाने गंगाखेड मतदारसंघात भाजपच्या (BJP) वतीने मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे विद्यमान आमदार असलेले रत्नाकर गुट्टेंना साथ मिळणार का हाच प्रश्न सध्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारसंघात चर्चिला जात आहे.

गंगाखेड मतदारसंघाची राज्यभरात 'लक्ष्मी अस्त्र'मुळे चर्चा असते. याच मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) हे विद्यमान आमदार आहेत. मागील एक वर्षापासून राज्यात चालू असलेल्या सत्तासंघर्षात गुट्टे भाजपला साथ देत सत्तेमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र, दुसरीकडे महादेव जानकर (Mahadev Jankar) हे भाजपवर नाराज आहेत. त्यांनी सध्या 'एकला चलो रे' ची भूमिका घेतली आहे.

Santosh Murkute, Ratnakar Gutte News
Kolhapur Politics : भर कार्यक्रमात आमदार आवाडे अन् माजी नगरसेवक चाळके भिडले; खासदार माने बघतच राहिले

जानकर सध्या राज्यभरात जन स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून भाजपवर हल्लाबोल करत आहेत. तसेच नव्या तयार झालेल्या 'इंडिया' आघाडीसोबतही त्यांची बिघाडीच आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरही ते जोरदार टीका करतात. त्यामुळे त्यांच्या भूमिकेमुळे सध्या गोंधाळाचे वातावरण आहे. असे असले तरी गुट्टे भाजपसोबत आहेत तर जानकर हे गुट्टे यांच्या शब्दाबाहेर जात नसल्याचेही अनेकवेळा अनुभव आलेले आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाकडून पुन्हा या मतदारसंघात गुट्टे हेच उमेदवार निश्चित मानले जात आहेत. दुसरीकडे भाजपने या मतदारसंघात स्वयंबळावर प्रयत्न सुरू केला आहे. भाजपने या मतदारसंघात इच्छुक असलेले संतोष मुरकुटे यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ घतली आहे. त्यामुळे त्यांनीही मतदारसंघात आपली ताकद वाढविण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू केल्या आहेत.

मतदारसंघात भाजप सर्व ताकदीने निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप निवडणुक लढणार की पुन्हा गुट्टेंनाच संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महादेव जानकर भाजपशी पुन्हा जुळवून घेतात का ? यावर बरीच गणिते अवलंबून असणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Santosh Murkute, Ratnakar Gutte News
Supriya Sule On NCP : कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लहान मुलालाही माहीत आहे `राष्ट्रवादी` म्हणजे शरद पवार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com