Kolhapur Politics : भर कार्यक्रमात आमदार आवाडे अन् माजी नगरसेवक चाळके भिडले; खासदार माने बघतच राहिले

Prakash Awade, Sagar Chalke News : माने यांच्या समोरच आवाडे आणि चाळके यांच्यामध्ये बाचाबाची झाली.
Prakash Awade, Sagar Chalke News
Prakash Awade, Sagar Chalke NewsSarkarnama
Published on
Updated on

राहुल गडकर

Kolhapur News : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छता अभियान कार्यक्रमातच इचलकरंजीमध्ये आमदार प्रकाश आवाडे आणि माजी नगरसेवक सागर चाळके हे एकमेकांना भिडले. या वेळी व्यासपीठावर खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) उपस्थित होते. माने यांच्या समोरच आवाडे आणि चाळके यांच्यामध्ये बाचाबाची झाली.

धर्मवीर संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या जागेवरून हा वाद झाला. हा वाद सुरू असताना माने मात्र शांत बसून होते. या वादाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. इचलकरंजीमध्ये रविवारी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade), महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, माजी नगरसेवक सागर चाळके उपस्थित होते.

Prakash Awade, Sagar Chalke News
Pankaja-Bawankule Visit : पंकजा मुंडेंनी भेटीसाठी आलेल्या बावनकुळेंना दीड तास ठेवले वेटिंगवर?

कार्यक्रम प्रसंगी आवाडे भाषण करत असताना, इचलकरंजी मधील के. एल. मलाबादे चौकामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यास परवानगी मिळाली आहे. ते काम लवकरात लवकर पूर्ण होईल, असे सांगितले. मात्र, त्यावर आक्षेप घेत माजी नगरसेवक सागर चाळके यांनी भर कार्यक्रमात आमदारांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला.

इचलकरंजीमध्ये छत्रपती संभाजी महाराज चौक असताना या चौकातच स्मारक व्हावे, अशी भूमिका चाळके यांनी घेतली. त्यावरून आमदार आणि माजी नगरसेवक यांच्यामध्ये खडाजंगी झालेली पाहायला मिळाली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Prakash Awade, Sagar Chalke News
Yavatmal Politics: यवतमाळची आणेवारी 61 पैसे दाखवल्याने शेतकरी नाराज ? तर काँग्रेसचं पालकमंत्र्यांकडे बोट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com