Manoj Jarange Patil : राज्यात आता गोरगरिबांची लाट, सत्ता परिवर्तनासाठी तयार राहा..

Manoj Jarange Appeal Community : जे मुंबईला गेले त्यांना मी दोष देणार नाही, कारण सध्या आमदार दरेकर यांचे मला बदनाम करण्याचे अभियान चालू आहे, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. जे मुंबईला गेले त्यांनी आंदोलन चालू असल्यावर विचारावे, दरेकर यांच्या अभियानातून नाही.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSatrkarnama
Published on
Updated on

दिलीप दखणे

Maratha Reservation News : देशात अन् राज्याच्या राजकारणात अनेक लाटा आल्या, गेल्या पहिल्यांदा महाराष्ट्रात गोरगरीब जनतेची लाट आली आहे. त्यामुळे सत्ता परिवर्तन अटळ आहे, त्यासाठी तयार राहा, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले. राज्यात मराठा समाजाला ज्यांनी कोणी विरोध केला त्यांना धडा शिकवायचा आहे, कितीही डावपेच टाका तरी उपयोग होणार नाही.

आरक्षणापासून वंचित असलेल्या सर्व धर्म, जातीमधील जनतेला सोबत घेऊन न्याय हक्कासाठी, आमची मागणी खंबीरपणे विधानसभेत मांडण्यासाठी मोठ्या संख्येने आमदार निवडून पाठवायचे आहेत. 29 ऑगस्ट रोजी राज्यातील मराठा समाज बांधवांची बैठक घेऊन या संदर्भात अंतिम निर्णय घेणार आहे. गाव,तालुक्यातील नागरीकांसह मराठा समाज बांधवांनी आपला डाटा गोळा करण्याचे काम हाती घ्या. 14 ते 20 ऑगस्टपर्यत यावर चर्चा करण्यात येईल, असे (Manoj Jarangae Patil) मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढची दिशा, उभे करायचे, की पाडायचे? या संदर्भात भूमिका मांडली. उध्दव ठाकरे यांनी मराठा आरक्षण बाबत भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी मातोश्रीवर आंदोलन सुरू आहे, याकडे लक्ष वेधले असता भूमिकेबद्दल उद्धव ठाकरे यांना जरूर विचारावे. पण सध्या राज्यात आंदोलन सुरु नाही, आंदोलन काळात सर्वच नेत्यांना विचारले पाहिजे.

Manoj Jarange Patil
Uddhav Thackeray On Maratha Reservation : दैवी शक्ती मोदींकडे, तेच मराठा आरक्षणावर तोडगा काढतील; पवारांच्या भूमिकेला ठाकरेंकडून छेद

जे मुंबईला गेले त्यांना मी दोष देणार नाही, कारण सध्या आमदार दरेकर यांचे मला बदनाम करण्याचे अभियान चालू आहे, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. (Maratha Reservation) जे मुंबईला गेले त्यांनी आंदोलन चालू असल्यावर विचारावे, दरेकर यांच्या अभियानातून नाही, असे सांगत या आंदोलनामागे मागे भाजपचे आमदार प्रविण दरेकर याच अभियान असल्याचा आरोप केला. मराठा आंदोलना मध्ये फुट पाडण्याचे काम होत असून ते यशस्वी होणार नाही.

एका क्रांती मोर्चाचे तीन क्रांती मोर्चे करण्याचे काम झाले आहे. आता समाज एक झाला आहे, उपमुख्यमंत्री फडवणवीस यांच्या माध्यमातून दोन, तीनजण या आंदोलनात फुट पाडण्याचे काम करत आहेत. सात तारखेला पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली निघत आहे. या दरम्यान काही गोधंळ घातला जाऊ शकतो, अशी शंका उपस्थीत करत सरकारने दखल घेतली पाहिजे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांचं ठरलं सात दिवसांत सात जिल्हे फिरणार !

आरक्षणा बाबत त्यांची भूमिका काय आहे ? हे सर्व नेत्यांना विचारायला मराठा समाज सक्षम आहे. जे मुंबईला गेले त्यांना दोष देऊन उपयोग नाही त्यांनी दरेकर यांचे अभियान ओळखावे. दरेकर यांच्या अभियानाकडे समाजाने अजिबात दुर्लक्ष करू नये, असे आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी केले. दरेकर यांचा बोलवता धनी उपमुख्यमंत्री फडवणवीस, मंत्री भुजबळ आहेत, असा आरोप करतानाच यात त्यांना यश येणार नाही.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात तरूण आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्री शिंदे व त्यांचे ओएसडी यांनी यात लक्ष घालून मदतीच्या फाईली निकाली काढाव्यात. ओएसडी यांना मस्ती आली आहे त्यांनी जातीवाद करू नये. ओएसडी साहेब तुम्ही काय उप पंतप्रधान होणार का ? हवेत उडू नका, अशा शब्दात मंगेश चिवटे यांच्यावर जरांगे पाटील यांनी टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com