Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दैवी शक्ती आहे. तेच मराठा आरक्षणावर तोडगा काढतील, असे खोचकपणे म्हणत आपण सर्व जण दिल्ली जाऊ, असे उद्धव ठाकरे यांनी सांगून शरद पवार यांच्या मराठा आरक्षणावर विसंगत, अशी भूमिका मांडली. उद्धव ठाकरे यांनी हा प्रश्न दिल्लीशी निगडीत आहे. लोकसभेतून आरक्षणाची मर्यादा वाढून घ्यावी लागेल. केवळ लोकसभेतूनच आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. आरक्षणावर मोदींनी भाष्य केले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
तर दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत आरक्षणाचा प्रश्न हा राज्याचा आहे. राज्याच्या नेतृत्वाचा आहे. दिल्लीचा जाऊन यावर काहीसा फरक पडणार नाही, असे म्हटले होते. त्यामुळे महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांमध्ये मराठा-ओबीसी आरक्षणावर विसंगत, अशी भूमिका समोर आली आहे.
मराठा आरक्षणावर शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका काय, अशी मागणी करत मराठा क्रांची मोर्चाने मातोश्रीवर आज सकाळी धडक मारली. मराठा समाज मातोश्री बाहेर येणार असल्याने मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मराठा समाजाच्या आंदोलकांशी सुरवातीला चर्चा केला. परंतु मराठा आंदोलकांनी उद्धव ठाकरे यांच्याशीच बोलण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. उद्धव ठाकरे यांनी यावर पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली.
मराठा आंदोलक मातोश्री बाहेर आले आहेत, ते कोणाच्या सांगण्यावरून आले आहेत, ते मला माहीत नाही. त्यामध्ये मी पडणार देखील नाही. माझे प्रामाणिकपणे त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, यावर मी ठाम आहे. हे राज्यकर्ते असताना मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असे वाटत नाही. आपण इकडे एकमेकांशी भांडण करण्यापेक्षा आपण दिल्लीला जाऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) सांगून तुम्ही यात लक्ष घाला. त्यांना दैवी शक्ती प्राप्त झालेली आहे. मोदीच यावर तोडगा काढावा, तो आम्हाला मान्य आहे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.
आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार राज्यांना नाही. जसे बिहारला आरक्षण दिले होते, ते कोर्टाने उडवले. मर्यादा वाढवयाची असेल, तर हा प्रश्न लोकसभेत सुटू शकतो. मी माझे खासदार सोबत द्यायला तयार असतील. मराठा, ओबीस, धनगर असो की अन्य, सर्वांनी मोदींकडे जावे, मोदींना गरिबांचा संघर्ष चांगला माहीत आहे. ते मागासवर्गीय असल्याचे सांगतात. आरक्षणाबाबत मोदी जो निर्णय घेतली, तो आम्हाला मान्य आहे. मराठा, ओबीसी, धनगर यांनी आरक्षणाच्या मर्यादा वाढवताना इतर कोणाला दुखवायचे नाही, हे मोदींनी सांगितले पाहिजे. आरक्षण वाढवण्यासाठी लोकसभेत काय तोडगा निघत असेल, तर त्याला मी पाठिंबा द्यायला, तयार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मधल्या काळात राज्य सरकारने नाटक करण्याचा प्रयत्न केला होता. सर्व पक्षांना बोलवून तुम्ही काय भूमिका आहे, हे विचारले होते. आम्ही म्हणणे मांडले आहे. सरकारने जेव्हा प्रस्ताव मांडले, त्यावेळी आम्ही पाठिंबा दिलेला आहे. आज देखील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमची ठाम भूमिका आहे. राजकारण्यांपेक्षा सर्वसामाजाच्या नेत्यांना बोलावे. सर्वसमावेशक तोडगा काढावा. शिवसेनेचा पाठिंबा आहे. आंदोलकांना देखील तेच सांगितले. तुम्हाला एकमेकांमध्ये लढवून, आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचे काम राजकीय पक्ष करत आहे. त्यामध्ये भाजप असो की, अन्य कोणताही पक्ष असतो, त्याचे स्वप्न साकार होवू देऊ नका. आपण एकाच आईचे, महाराष्ट्राचे लेकरं आहोत. समाजासमाजामध्ये असे वितुष्य योग्य नाही. सर्व समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन तोडगा काढा, त्याला शिवसेनेची संपूर्ण सहकार्य असेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.