Beed : ही दोस्ती तुटायची नाय, ३६ वर्षांपासूनची मैत्री, राजकीय वाटचालही सारखीच..

आता पुन्हा योगायोग असा कि दोघे अंबाजोगाई तालुक्यातील. राजेश्वरराव चव्हाण हातोलाचे तर राजेसाहेब देशमुख माकेगावचे. (Beed News)
Rajeshwarrao Chavan-Rajesaheb Deshmukh,Beed
Rajeshwarrao Chavan-Rajesaheb Deshmukh,BeedSarkarnama

बीड : ही दोस्ती तुटायची नाय हे मराठी चित्रपटातील गाणे चांगलेच परिचित आहे. बीड जिल्ह्यातील दोन राजकीय नेत्यांसाठी ते तंतोतंत लागू पडते. (Beed) ३६ वर्षापासून एकमेकांचे मित्र असलेल्या या दोघांची राजकीय वाटचालही सारखीच. (Congress) एक काॅंग्रेसचा जिल्हाध्यक्ष तर दुसरा मित्र राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष. (Ncp) त्यामुळे या दोस्ती आणि राजकीय योगायोगची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच होत आहे. (Marathwada)

काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची ३६ वर्षांपासूनची मैत्री आहे. या दोन्ही जिवलगांना जिल्हाध्यक्षपदांचा मान मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या दोन्ही पक्षांची जिल्हाध्यक्षपदे आता अंबाजोगाई तालुक्यात गेली आहे. देशमुख- चव्हाण महाविद्यालयीन जिवनापासून मित्र आहेत.

हजरजबाबी, विनोदी असलेले राजेसाहेब व राजेश्वरराव यांना एखादा प्रसंग हुबेहूब डोळ्यासमोर उभा करण्याची कला अवगत आहे. दोघांच्याही घरात राजकीय वारसा नाही, दोघांचेही वडिल नोकरदार. मात्र, संघटन कौशल्य, भाषणशैली असल्याने दोघेही राजकारणात आले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीचे किस्से राज्याच्या राजकारणात आजही चर्चिले जातात.

विशेष म्हणजे विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे या दोघांच्या ही राजकीय भूमिका कायम वेगळ्या होत्या. मात्र महाविद्यालयीन काळापासून सोबत शिक्षण घेतलेले दोन मित्र कधीही वैयक्तिक एकमेकांच्या विरोधात टीका टिप्पणी करताना दिसले नाहीत. विशेष म्हणजे या दोघांची मैत्रीही त्याच अंबाजोगाई, परळी व लातूर भागातच बहरली.

अंबाजोगाईत १९८६ साली राजेश्वर चव्हाण व राजेसाहेब देशमुख यांची मैत्री झाली. नेतृत्व गुण, संघटन कौशल्य, भाषण शैली असल्याने दोघांनीही त्याच काळापासून महाविद्यालयांत नेतेगिरी सुरु केली. राजेश्वर चव्हाण आणि राजसाहेब देशमुख हे दोघे जवळपास आठ वर्ष एकाच खोलीमध्ये राहायला होते. माध्यमिक शिक्षणानंतर अंबाजोगाईच्या योगेश्वरी विद्यालयातील होस्टेलमध्ये काही दिवस एकत्रित घालवल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी दोघेही लातूरला गेले आणि तेथेही नऊ वर्षे एकाच खोलीत राहिले.

Rajeshwarrao Chavan-Rajesaheb Deshmukh,Beed
आर्यन खानला दिलासा नाहीच; एनसीबीचे चिंता वाढवणारे स्पष्टीकरण

तेव्हा दोघांचेही नेते दिवंगत विलासराव देशमुख व माजी मंत्री दिलीपराव देशमुख होते. या दोघांनीही काही काळ लातूर जिल्ह्यातही आपल्या नेतृत्वगुणाची छाप पाडली. नंतर १९९२ साली राजेश्वर चव्हाण जिल्हा परिषद सदस्य तर राजेसाहेब देशमुख पंचायत समिती सदस्य झाले. विशेष म्हणजे दोघेही काँग्रेस पक्षाकडून लढले आणि राजेश्वररावांनी बर्दापूर गटातून जिल्हा परिषद सदस्य होण्याचा मान मिळविला. तर राजेसाहेबांनी याच गटातील गणातून पंचायत समितीमध्ये पाऊल ठेवले.

त्यानंतर दोघांनीही राष्ट्रवादी काँग्रेसची कास धरली. पण, फरक येवढा झाला कि राजेश्वर चव्हाण व राजेसाहेब देशमुख यांना स्थानिक पातळीवर कोणी नेता गॉडफादर नव्हता. राजेसाहेब देशमुख यांना काही काळ माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील व माजी खासदार रणजिसिंह मोहीते पाटील यांनी बॅकअप दिले. या दोघांचीही थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे सुरुवातीपासून ये-जा होती. काँग्रेसमध्येही या दोघांनी पदं भूषवली.

आता पुन्हा योगायोग असा कि दोघे अंबाजोगाई तालुक्यातील. राजेश्वरराव चव्हाण हातोलाचे तर राजेसाहेब देशमुख माकेगावचे. काँग्रेसच्या हिमाचल व जम्मू काश्मिर प्रभारी असलेल्या खासदार रजनी पाटील यांच्या बॅकअपमुळे राजेसाहेबांना तीन महिन्यांपूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद मिळाले. तर, राजेश्वर चव्हाण यांना थेट मोठ्या पवारांमुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मिळाले.

त्यासाठी त्यांना आमदार प्रकाश सोळंके, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, आमदार बाळासाहेब आजबे, मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी बॅकअप दिले. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात राजेश्वररावांची राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोशल मिडीयावरुन अभिनंद व शुभेच्छांचा वर्षाव तर केलाच शिवाय अंबाजोगाईत राजेसाहेबांसह समर्थकांनी जंगी सत्कारही केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com