Sharad Pawar On Rajesh Tope : आरोग्यमंत्री म्हणून टोपेंचे कार्य स्पृहणीय, `लोक माझे सांगाती`त पवारांकडून कौतुक

Maharashtra : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यावेळी केलेली कामगिरी फारच स्पृहणीय होती. राजेश सर्व निर्णयांवर चौफेर लक्ष ठेवून होता.
Sharad Pawar On Rajesh Tope News
Sharad Pawar On Rajesh Tope NewsSarkarnama

Tirthpuri : `कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात वास्तविक महाराष्ट्र हॉटस्पॉट असूनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यावेळी केलेली कामगिरी फारच स्पृहणीय होती`, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी `लोक माझे सांगाती` या आपल्या राजकीय आत्मकथेत नमूद केले आहे.

Sharad Pawar On Rajesh Tope News
Sanjay Shirsat On Sanjay Raut News : राऊतांसारख्या सल्लागारांमुळेच उद्धव ठाकरेंवर ही परिस्थीती ओढावली..

`लोक माझे सांगाती` मध्ये शरद पवार म्हणतात, `कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात वास्तविक महाराष्ट्र हॉटस्पॉट असूनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यावेळी केलेली कामगिरी फारच स्पृहणीय होती. (Marathwada) राजेश सर्व निर्णयांवर चौफेर लक्ष ठेवून होता. राजेश आणि राष्ट्रवादीचे सारे मंत्री प्रत्यक्ष मैदानात सक्रिय होते`, अशा शब्दात पवारांनी टोपे यांचे कौतुक केले.

एकीकडे आजारी आई आयसीयूमध्ये, दुसरीकडे महाराष्ट्र माऊली कोरोनाच्या विळख्यात, पण डगमगून न जाता धीरोदात्तपणे तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) मैदानात उतरले. आईची काळजी घेताना महाराष्ट्र माऊलीसाठी जणू पायाला भिंगरी लागल्यागत त्यांनी कोरोनाकाळात कार्य केले. (Jalna) अर्थात या कार्याची नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या `लोक माझे सांगाती` या राजकीय आत्मकथनामध्ये शरद पवार यांनी विशेष दखल घेतली.

कोरोनायोद्धा टोपे यांच्या कार्यावर त्यांनी स्तुतिसुमने उधळली आहेत. कोरोनामुळे लोक चार भिंतीच्या आत, बाहेर जायला, कुणाच्या संपर्कात यायलाही कोणी धजावत नव्हते. अशावेळी आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे मात्र अवघे राज्य पालथे घालत होते. आरोग्य विभागाची अभूतपूर्व अशी सक्रियता त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी पाहिली. या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आजारी असलेल्या आईचे निधन झाल्यानंतर राजेश टोपे यांनी तीन दिवसात सर्व विधी उरकला.

आई गेल्याचे दुःख मनाच्या कोपऱ्यात ठेऊन ते पुन्हा कामाला लागले होते. कोरोनाकाळात आरोग्य विभागाची सर्व सूत्रे समर्थपणे सांभाळली. शासकीय रुग्णालयांचा त्यांनी कायापालट केला. ठिकठिकाणी शासकीय रुग्णालयात युद्धपातळीवर ऑक्सिजन प्रकल्प उभारले. व्हेंटिलेटरसह विविध सुविधा शासकीय रुग्णालयात आल्या. कोरोना संशयितांच्या नमुन्यांच्या चाचण्या स्थानिक पातळीवर व्हाव्यात म्हणून प्रयोगशाळा सुरु केल्या, टेस्टींगची व्यवस्था केली.

Sharad Pawar On Rajesh Tope News
Health Department Recruitment News : इम्तियाज यांच्या याचिकेला यश, न्यायालयाच्या आदेशाने आरोग्य विभागात मेगा भरती...

राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय ठेवला. त्यामुळे कोरोनाकाळात सक्षम आरोग्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्यक्षमतेचा अवघ्या देशाला प्रत्यय आला. त्यामुळेच शरद पवार यांना त्यांच्या राजकीय आत्मचरित्रामध्ये टोपे यांच्या कार्याचा उल्लेख करणे आवश्यक वाटले असावे. यावर राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, महाराष्ट्रातील तीन पिढ्यांचे शरद पवार हे नेते आहे. हिमालया इतक्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाने `लोक माझे सांगाती` मध्ये कौतुक करणे ही निश्चितच मनाला समाधान देणारी गोष्ट आहे. त्यांचे मार्गदर्शन, तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे सहकार्य आणि आरोग्य विभागातील अधिकारी, डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, स्वच्छता कर्मचारी यांच्या प्रत्येकाच्या सहकार्यामुळेच आरोग्यमंत्री म्हणून चांगले काम करू शकलो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com