Maharashtra : खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील (Health Department Recruitment News) रिक्त पदा संदर्भात याचिका दाखल केली होती. या जनहित याचिकेच्या सुनावणी अंती दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय / दंत / आयुर्वेद / होमीओपॅथीक महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील (Health Department) तसेच मानसिक आरोग्य विभागांतर्गत सरळसेवेने तांत्रिक, अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील विविध पदे परिक्षेव्दारे भरती करीता जाहीरात प्रसिध्द करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने राज्यातील विविध शासकीय रुग्णालयात गट-क या संवर्गातील विविध पदे भरण्याकरिता राज्यस्तरीय स्पर्धा परिक्षा-२०२३ चे आयोजन केले आहे.
परिक्षेकरिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची तारीख १० ते २५ मे २०२३ आहे. राज्यातील कोरोना महामारीच्या संदर्भात खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठामध्ये (Aurangabad High Court) जनहित याचिका क्र. ४७/२०२१ दाखल केली होती. विशेष म्हणजे इम्तियाज हे स्वत: व्यक्तिश: न्यायालयात त्यांची बाजु मांडून युक्तिवाद करत आहेत.
उच्च न्यायालयात वेळोवेळी झालेल्या सुनावणीत इम्तियाज जलील यांनी आरोग्य विभागातील वैद्यकीय रिक्त पदांमुळे सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांचे कशा प्रकारे हाल होत आहेत हे न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले होते. तसेच राज्यात वैद्यकीय रिक्त पदांची इत्यंभुत माहिती सुध्दा न्यायालयात सादर केली होती. सदरील प्रकरणाची गंभीरतेने दखल घेवून न्यायालयाने शासनाला रिक्त पदे भरती संदर्भात कालबध्द कार्यक्रम सादर करुन आरोग्य विभागात विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे अंतिम आदेश दिले होते.
तसेच यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे आदेशात नमुद केले होते. इम्तियाज यांच्या माहितीप्रमाणे जाहीरातीत दिलेल्या विविध संवर्गातील पदांसाठी शैक्षणिक अर्हता प्राप्त ८ ते १० हजार जणांना महाराष्ट्रातील विविध शासकीय रुग्णालयात नोकरी लागणार आहे. जाहिरातीमध्ये विहीत केलेल्या अटी, शर्तीची पूर्तता करणार्या उमेदवारांनी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीव्दारे अर्ज सादर करण्याचे आवाहनही इम्तियाज जलील यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.