Dhnanjay Munde On Onion Prize
Dhnanjay Munde On Onion PrizeSarkarnama

Dhnanjay Munde On Onion Prize : व्यापाऱ्यांनी २५ पैसे किलोने कांदा खरेदी केला, शेतकऱ्यांच्या मनाला काय वेदना झाल्या असतील..

Farmers : अनुदानासाठी पात्र कांदा विक्रीस किमान १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी.
Published on

Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचा प्रश्न (Onion Prize) देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. तो त्याच्या पडलेल्या दरांमुळे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात नाशिकच्या शेतकऱ्यांनी कांदा प्रश्नावर थेट पायी चालत विधीमंडळाकडे आगेकूच केली होती. पण सरकारने मध्यस्थी करत शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले आणि हा मोर्चा रोखण्यात आला. परंतु सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे नफेखोर व्यापारी शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने खरेदी करत आहे.

Dhnanjay Munde On Onion Prize
Nanded Loksabha News : महाविकास आघाडीला संधी, पण अशोकरावांनी मनावर घेतले तर..

अगदी २५ पैसे प्रति किलोने काद्यांची खरेदी काही व्यापाऱ्यांनी केली. याच मुद्यावर माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांनी सरकारला जाब विचारत कांदा विक्रीला पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना केली आहे. या संदर्भात मुंडे यांनी एक ट्विट केले आहे. राज्य शासनाने कांद्याला जाहीर केलेल्या अनुदानाचा लाभ ३१ मार्चपर्यंत विक्री झालेल्या कांद्यालाच मिळेल, असा फतवा काढला होता.

याचा गैरफायदा घेऊन व्यापाऱ्यांनी आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना कात्रीत पकडून कवडीमोल भावाने कांदा खरेदी केला. अशाप्रकारे शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात यावी. नाशिक जिल्ह्यात या अडवणुकीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांचा कांदा बदमाश व्यापाऱ्यांनी २५ पैसे प्रतिकिलोने घेतला.

त्या शेतकऱ्यांच्या मनाला काय वेदना झाल्या असतील? शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याबरोबरच अनुदानासाठी पात्र कांदा विक्रीस किमान १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी. तसेच महाराष्ट्राच्या बाहेर विकलेल्या कांद्याला देखील अनुदान देण्यात यावे, अशी मागणी देखील मुंडे यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com