Marathwada : कृषी खात्याचा पदभार गेला तरी अब्दुल सत्तार यांना शेतकऱ्यांसमोर बोलतांना कृषीमंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयांची पदोपदी आठवण येत आहे. आपल्या भाषणातून त्या निर्णयांची उजळणी करतांना ते दिसत आहेत. (Abdul Sattar News) कृषीमंत्री म्हणून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, आता पणन मंत्री म्हणून शेतीमालाला चांगला भाव मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील, असे आश्वासन अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
औरंगाबाद (Aurangabad) जिल्हा मध्यवर्ती बँकेने आता यापुढे शेतकऱ्यांचा पीकविमा भरावा. यासाठी लागणारे सातबारा व इतर कागदपत्राची प्रक्रिया देखील बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण करावी, अशा सूचना देखील सत्तार (Abdul Sattar) यांनी दिल्या. शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. पण काही लोक शेतकऱ्यांकडून जास्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी येत असल्याचे सत्तार म्हणाले.
जिल्हा बँकेने पीकविमा भरण्यासाठी पुढाकार घेतला तर शेतकऱ्यांची अडवणूक, पिळवणूक होणार नाही. (Shivsena) बँकेच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना चांगली सेवा देऊ शकतो. शेतकऱ्यांना पाहिजे त्यावेळी कर्ज देण्यास जिल्हा बँक सक्षम आहे, मात्र घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करणे ही प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य आहे.
कृषिमंत्री असतांना शेतकऱ्यांच्या भावना मांडल्या अतिवृष्टी असेल किंवा सततचा पाऊस असो, बारा हजार कोटींची नुकसानभरपाई शेतकरी बांधवांना दिली. सूर्यफूल आणि कापूस यासाठी एक हजार कोटीची तरतूद केली. कापूस व मका उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आता पणन खात्याची जबाबदारी मला देण्यात आली, या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला जास्तीत जास्त भाव मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल, असे आश्वासन सत्तार यांनी यावेळी दिले.
तर पारदर्शक कारभारामुळे जिल्हा बँकेवर लोकांचा विश्वास वाढत असल्याचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. सहकार क्षेत्रात राजकारण व पक्षीय भेदभाव दूर ठेवल्यास संस्था जास्त काळ टिकतात. १-२ टक्के व्याजदर वाढून देणाऱ्या संस्थेच्या आमिषाला बळी न पडता सुरक्षित ठेवी व व्यवहारासाठी जिल्हा बँकेसारखे विश्वासाचं सहकार क्षेत्र निवडा असे आवाहन देखील त्यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.